मक्याचे गुलाबजाम Maka Gulabjam
साहित्य : १ वाटी कोवळ्या पांढऱ्या कणसाचा गर, १ वाटी मावा, २ टेबलस्पून कॉर्न फ्लोअर, चिमुटभर बेकिंग पावडर, साखर दीड वाटी, रोझ इसेन्स, वेलची, जायफळ पूड थोडंसं केशर.
कृती : प्रथम कणसं किसून त्याचा गर घ्यावा. त्यात १ वाटी मावा (किसून) आणि दान मोठे चमचे कॉर्न फ्लोअर, किंचित मीठ, चिमुटभर बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने एक जीव करावं आणि त्याचे छोटे छोटे लांबट गोळे करून तुपात तळून घ्यावेत. दीड वाटी साखरेत अधीर् वाटी पाणी घालून पाक तयार करावा. पाकात वेलची, जायफळ पूड, केशर आणि रोझ इसेन्स घालून त्यात तळलेले गुलाबजाम घालावेत. किमान एक तासभर पाकात मुरू द्यावेत नंतर गरम अथवा थंड खाण्यास द्यावेत.
.............
मक्याचे शाही मोदक Maka Shahi Modak
साहित्य : १ वाटी अमेरिकन मक्याच्या कणसाचे दाणे, पाव वाटी दूध, अधीर् वाटी साखर, साजूक तूप (अधीर् वाटी), २ ते ३ चमचे खवा, वेलची पूड, रवा, पिवळा रंग, काजू, बदाम बारीक करून.
कृती : प्रथम मक्याचे दाणे दूध घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावेत. कढईमध्ये प्रथम खवा भाजून घेऊन नंतर तूप टाकून त्यात बारीक केलेला मका घालावा. मंद आंचेवर चांगला खमंग भाजावा. नंतर एका भांड्यात साखर घेऊन त्यात साखर बुडेल एवढं पाणी टाकावं आणि एक तारी पाक करावा. नंतर त्या पाकामध्ये मका आणि खवा मिसळावा. हे मिश्रण गॅसवर जरा घट्ट होईतोवर ढवळावं नंतर खाली ऊतरवून त्यात वेलची पूड, काजू, बदामची भरड आणि रवा, रंग घालून ढवळावं आणि थंड होऊ द्यावं. थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यातून मोदक करावेत आणि आपल्या आवडीनुसार सजावट करून र्सव्ह करावं.
..............
मका इडली Maka Idali Recipe
साहित्य : मका एक वाटी, रवा अधीर् वाटी, पनीर अर्धा कप, दूध अधीर् वाटी, २ चमचे तेल, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ, बेकिंग पावडर, फोडणीसाठी मोहरी.
कृती : रवा भाजून थंड करायचा. मका किस, पनीर आणि दूध (मोहरी तुपात फोडणीला द्यायची), नंतर बेकिंग पावडर (पाण्यात विरघळवलेली) आणि चवीपुरतं मीठ घालावं. हे सर्व एकत्र करून त्यात रवा घालावा. नंतर इडली पात्राला तेल लावून त्यात हे मिश्रण घालून १५ मिनिटं आंच्ेवर ठेवावी. छानपैकी इडली तयार. नंतर खोबऱ्याच्या चटणीसोबत ही इडली र्सव्ह करावी.
baby corn recipe in marathi language
corn bhaji recipes in marathi
corn tikki recipe in marathi
corn recipes indian in marathi
baby corn bhaji recipe in marathi
No comments:
Post a Comment