Wednesday, September 28, 2016

Sevai Upma recipe in marathi


Sevai Upma Recipe

साहित्य Ingredients - १ कप शेवया, २ कप गरम पाणी, १/२ कप मटारचे दाणे, १-२ हिरव्या मिरच्या, किसलेलं बीट, किसलेलं गाजर, घेवडा, फ्लॉवर, सिमला मिरची, मक्याचे दाणे (आवडीनुसार भाज्या), चवीप्रमाणे मीठ, साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून तेल, जिरे, मोहरी, हिंग.

कृती - तेल न घालता शेवया कढईत थोड्या लालसर रंगावर भाजून घ्याव्यात. त्या बाजूला काढून ठेवून त्याच कढईत तेल तापवून घ्यावे. त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता घालावा. मोहरी थोडी तडतडली की त्यात उडीद डाळ घालून तांबूस रंगावर भाजू द्यावी. त्यातच मिरची घालावी. त्यावर मटारचे दाणे घालून बारीक गॅसवर २-३ मिनिटं परतावं. त्यावर भाजलेल्या शेवया घालाव्यात व २-३ मिनिटं परतावं. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून वरून दीड कप गरम पाणी ओतावे. मिश्रण नीट हलवून झाकावे. शेवया शिजल्या नाहीत आणि पाणी आटले तर उरलेले पाणी घालून पुन्हा झाकून ठेवावे. शेवया जरा फुलल्यासारख्या वाटल्या की झाकण काढून ठेवावे. त्यावर लिंबाचा रस आणि साखर घालून नीट मिसळावे. उरलेले पाणी आटवून टाकावे. शेवया नीट शिजून मोकळी होण्यासाठी त्यात अर्धा चमचा साजूक तुपाची धार सोडावी, म्हणजे प्रत्येक शेवयी सुटी होते. आवडत असेल तर बारीक चिरलेला कांदा फोडणीत घातला तरी हरकत नाही.
========

 साहित्य:
१/२ कप रवा
सव्वा ते दिड कप पाणी
१/२ कप कांदा बारीक चिरुन
१ टेस्पून तेल किंवा २ टिस्पून तूप
फोडणीसाठी : १/४ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जीरे, १/४ टिस्पून हिंग
२-३ मिरच्या बारीक चिरुन
३-४ कढिपत्त्याची पाने
१/४ टिस्पून किसलेले आले
१/२ टिस्पून उडीद डाळ
३-४ काजू बी (ऑप्शनल)
चवीनुसार मीठ
१ टिस्पून साखर
२ टेस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
२ टिस्पून लिंबूरस

कृती:
१) सर्वप्रथम रवा व्यवस्थित भाजून घ्यावा.
२) मध्यम आचेवर कढईत तेल/तूप गरम करून त्यात मोहोरी, जीरे, हिंग, आले, उडीद डाळ घालावी. उडीद डाळ लालसर झाली कि कढिपत्ता, मिरच्या, काजू घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा परतून घ्यावा. आवडत असल्यास टोमॅटोच्या ४-६ फोडी घालाव्या.
३) रवा घालून २-३ मिनिटे मध्यम आचेवर परतावे. दुसर्या शेगडीवर पाणी गरम करत ठेवावे. त्यात आधीच अर्धा चमचा मीठ आणि थोडी साखर घालावी. त्यामुळे उपम्याला मीठ व्यवस्थित लागेल.
४) पाणी चांगले गरम झाले की कढईत घालावे. आणि ढवळून वरून झाकण ठेवावे. १ मिनिटाने उपम्याची चव बघून मीठ adjust करावे. वाफ काढावी.
५) उपमा तयार झाला कि डिशमध्ये काढावा वरून कोथिंबीर घालावी, लिंबू पिळावे.

टीप :
१) काही जणांना उपमा अगदी मऊसर लागतो त्याप्रमाणे अर्धा वाटी गरम पाणी जास्त घालावे.
२) उपम्यावर बारीक शेवसुद्धा छान लागते.
========


आवश्यक सामग्री - Ingredients for Rava Upma

    सूजी - 150 ग्राम (1 कप)
    तेल - दो टेबल स्पून
    मुगफली के दाने - 50 ग्राम (1/3 कप)
    राई के दाने - एक छोटी चम्मच
    उरद दाल - 2 छोटे चम्मच
    हरी मिर्च - 2 य 3 बारीक कटी हुई
    अदरक - 1 इंच टुकड़ा (छोटा छोटा काट लीजिये)
    हरी मटर के दाने - आधा कटोरी
    गाजर - एक छोटी कटोरी कतरी हुई
    घी - 1 टेबल स्पून
    हरा धनियाँ - 50 ग्राम बारीक कटा हुआ
    हरा नरियल - 1टेबिल स्पून कद्दूकस किया हुआ
    नमक - स्वादानुसार (1 छोटी चम्मच)

बनाने की बिधि - How to make Rava Upma

सबसे पहले मूगफली के दानों को भून कर छील लीजिये या बाजार से भुने हुये दाने लेकर उनका छिलका उतार कर, किसी प्याले में रख दीजिये.

सूजी को सूखी कढ़ाई में हल्का भूरा होने तक चलाते हुये भूनिये. भुनी सूजी को किसी प्लेट में निकाल लीजिये.

कढ़ाई मे घी डाल कर गरम करिये. राई के दाने डाल दीजिये, दाने कढ़कढ़ाहट के साथ भुनने लगेगे, उरद दाल डालिये, दाल के दाने हल्के ब्राउन होने के बाद मूंगफली के दाने डालकर हल्का सा भूनिये, हरी मिर्च और अदरकर डाल कर थोड़ा सा भूनिये. मटर के दाने और कटे हुये गाजर भी डाल दीजिये, सब्जियों को 2-3 मिनिट तक भूनिये. इसके बाद सूजी का तीन गुना पानी (3 कप पानी) और नमक डाल दीजिये, सूजी डाल कर चमचे से चला दीजिये . जब सूजी के पानी में उबाल आने लगे , तब आप उसे चमचे से चलाते जाइये, घोल गाढ़ा होता जायेगा और थोड़ी ही देर में हलुवा जैसा लगने लगेगा. रवा उपमा को चमचे से चलाते हुये 3-4 मिनिट तक पकाइये, देशी घी डालकर मिला लीजिये.  स्वादिष्ट रवा उपमा तैयार है.

उपमा को प्याले में निकाल लीजिये और हरे धनियाँ तथा नारियल ऊपर से डालकर सजाइये. आज नास्ते में गरमा गरम उपमा, हरे धनिये की चटनी के साथ परोसिये और खाइये.
==========


'उपमा बनविण्यास जेवढा सोपा, त्याहीपेक्षा तो पचनासाठी अधिक चांगला' अशी उपम्याची ओळख झाली आहे. बनविण्याच्या विविध पध्दतींमुळे खमंग उपम्याने आपली 'एनी टाइम' ही प्रतिमा जपली आहे. नाशिमध्ये बहुतांश हॉटेल्समधील मेन्यूकार्डच्या ब्रेकफास्ट लीस्टमध्ये उपमा हे नाव अविभाज्य बनले आहे.

रात्रीच्या झोपेनंतर मेंदूतील ग्लुकोजच्या प्रमाणाचा समतोल राखण्यासाठी नाश्ता गरजेचा ठरतो, असं आहारतज्ज्ञ सांगतात. बहुतेकदा नाश्त्यामागील या शास्त्रीय दृष्टीकोनापेक्षाही आपण नाश्त्याच्या नावाखाली जीभेचे चोचले पुरव‌ितो, पण खरा नाश्ता कशाला म्हणावे, याचा प्रत्यय उपम्यासारख्या पदार्थांच्या समावेशातूनच येतो. महाराष्ट्रातल्या घराघरात स्थान मिळव‌िलेला रव्याचा उपमा दक्ष‌िणेतही तेवढाच लोकप्र‌िय आहे. दक्ष‌िण भारतीय पदार्थांच्या बरोबरीने उपम्याला मागणी असते. हलकाफुलका या शब्दाला समांतर ठरणारा उपमा बहुतेकदा चमचमीत मिसळ, पोहे अन् स्पायसी पदार्थांच्या तुलनेत स्थान पटकावून जातो. जास्त स्पायसी पदार्थांच्या तुलनेने या पदार्थात तेलाचा किंवा तुपाचा उपयोगही अत्यंत मर्याद‌ित प्रमाणात केला जातो, पण बरोबरीला विव‌िध पध्दतींनुसार कढीपत्ता, टोमॅटो, म‌िरची, मोहरीची फोडणी, उडीदाची दाळ, आलं अन् साखरेचा एकत्र‌ित वापर अशा फंड्यांमुळे हॉटेलगण‌िक उपम्याची चवही थोड्याफार फरकाने बदलते. त्यातबरोबर उपम्यात वाटाणा, शेंगदाणा, उडीदडाळ टाकली असेल तर तो खासच लागतो. उपम्यावर फरसाण अथवा किसलेला नारळ, चवीनुसार लिंबू टाकल्यास उपमा काय लागतो व्वा...!

वकीलवाडी अन् एमजीरोड परिसरातही काही हॉटेल्समध्ये चवदार, गरमागरम उपमा सर्व्ह केला जातो. यात सुखसागर रेस्टॉरंटमध्ये गरमागरम खुसखुशीत बनव‌िलेला उपमा खवळलेली भूक थांबवून धरतो. कढीपत्त्याचा स्वाद अन् सोबतच्या खोबऱ्याच्या चटणीमुळे जीभेवर या उपम्याचा स्वाद तरळत राहतो. याच परिसरात हॉटेल विनयमध्ये मिळणारा अन् भाताच्या मुदेच्या आकाराची उपम्याची ड‌िश नाश्त्यासाठी चांगला पर्याय ठरते. येथे गरमागरम उपम्यात कोवळ्या टोमॅटोचा स्वाद स्वादीष्टपणा वाढवून जातो. या उपम्यावर भुरभुरलेली बारीक शेव, त्यात परतून घातलेला लाल करपलेल्या रंगाचा कांदा अन् त्यावर पसरलेली ह‌िरवीगार कोथंबीर खव्वयांना भुरळ न घालणार तरच नवल. येथूनच थोडे पुढे आल्यानंतर एमजीरोडच्या मध्यावर साऊथ इंड‌ियनसह शाकाहारी पदार्थांसाठीचा चांगला पर्याय असणारे हॉटेल अन्नपूर्णा. या हॉटेलमध्येही गरमागरम उपमा नाश्त्याला बेस्ट ठरतो. कढीपत्त्याचा स्वाद अन् त्याच बरोबरीला त्यात घातलेली उडदाची दाळ जीभेला चांगला स्वाद देऊन जाते. या उपम्यासोबत ओल्या खोबऱ्याची चटणी या स्वादाची रंगत वाढवूनच जाते. काही ठ‌िकाणी उम्यामध्ये आलं अन् साखरेचाही उपयोग करतात. आलं किसून उपम्यात घातले जाते. जीरे, मिरच्या, करपलेला कांदा, कढीपत्ता, टोमॅटो यांच्या जोडीला आलं अन् च‌िमुटभर साखरेचा स्वाद मिसळलेला उपमा जीभेची गेलेली चव परत आणतो. या विविध पध्दतींचा वेळोवेळी उपयोग करून घरात किचेनमध्ये केला जाणाऱ्या उपम्यातील चवही सातत्याने वेगळ्या रेस‌िपींच्या आधारे बदलती ठेवता येऊ शकते, याचाच प्रत्यय शहरातील विविध हॉटेल्स देतात. ट‌िळकपथवरील हॉटेल जगन्नाथ अन् सीबीएस परिसरातील हॉटेल पद्मा, जुन्या सीबीएस समोरील हॉटेल प्र‌िया येथेही हा उपमा जीभेवर स्वाद ठेवून जातो. श‌िवाय गोळे कॉलनीतील हॉटेल मनाली, कॉलेज रोड, गंगापूर रोड, शरणपूररोड परिसरातील व‌‌िव‌िध उडपी हॉटेल्सही उपम्यासाठी उत्तम पर्याय ठरतात. या श‌िवाय डोक्यावरील पागोट्यावर जर्मलचे मोठे भांडे ठेवून सकाळी जोर जोराने हॉर्न वाजव‌ित शहरभर फ‌िरणाऱ्या काही दाक्ष‌िणात्य लोकांकडेही इडली, वड्यांसह उपमाही उपलब्ध असतो. त्यांच्या उपम्याची टेस्टही अनोखा स्वाद जीभेवर ठेवून जाते. याश‌िवाय रव‌िवार कारंजा, अशोक स्तंभ अशा विविध गजबजलेल्या ठ‌िकाणीही नाश्त्याच्या इस्टंट स्टॉलवरही उपमा भुरळ पाडतो.

असा बनवा उपमा

एक वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे,

मोहरी, एक ग्लास पाणी, एक चमचा तूप, आवश्यकतेनुसार तेल, बारीक शेव,

चिमुटभर साखर, चवीनुसार मीठ, बारीक च‌रलेल्या हिरव्या मिरच्या, ह‌िरवी कोथिंबीर.

कृती-

कढईत तूप गरम करून त्यावर रवा भाजून घ्या. दुसऱ्या आता वेगळ्या कढईत तेल गरम करून जीरे, मोहरी, कांदा, हिरव्या मिरच्या, हळद, मीठ व साखर टाकून परतवून घ्या. त्यात योग्य प्रमाणात पाणी टाकून उकळी येऊ द्या. त्यात भाजलेला रवा टाकून चमच्याने एकजीव करा. झाकण ठेवून थोडावेळ शिजवा. रवा फुलून आल्यांनंतर गॅस बंद करा. ड‌िशमध्ये उपमा काढून कोथ‌िंबीर, बारीक शेव, खोबऱ्याचा किस टाकून सजावट करा. उपम्याची ही गरमा गरम ड‌िश खवय्यांच्या मनावर भुरळ टाकेल. 
===========



rava upma recipe in marathi language

sevai upma recipe in marathi

upma recipe in marathi video

upma recipe marathi style

upma recipe in hindi

recipe of upma by sanjeev kapoor

bread upma recipe

kande pohe recipe in marathi

उपमा बनाने की विधि

उपमा अलंकार

उपमा की विधि

उपमा कैसे बनाये

उपमा रेसिपी

उपमा मराठी

उपमा रेसेपी

No comments: