केक किंवा पेस्ट्रीज बघितल्या की, तोंडाला पाणी सुटतं. सध्या रेड व्हेलव्हेट सारख्या पेस्ट्रीज लोकांच्या पसंतीस उतरत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या स्टाइलचे म्हणजेच कप केक, पॅनकेक हिट ठरतायत. यामध्ये भर पडली आहे ती मग केकची. स्टायलिश मगमध्ये बनवायच्या चवदार केकच्या काही रेसिपीज खास तुमच्यासाठी...
चॉकलेट मग केक Chocolate mag cake
साहित्य ingredients- पाव कप मैदा, २ मोठे चमचे कोको पावडर, १ चिमूट बेकींग पावडर, २ मोठे चमचे साखर, १ चिमूट मीठ, दीड कप दूध, २ मोठे चमचे तेल
कृती-सर्वात प्रथम मैदा, कोको पावडर, बेकींग पावडर, साखर, मीठ एकत्र करा. त्यामध्ये दूध आणि तेल घालून मिश्रण व्यवस्थित एकत्र करा. मिश्रणामध्ये एकही गुठळी राहणार नाही याची काळजी घ्या. मायक्रोवेव्हसाठी योग्य अशा मगमध्ये मिश्रण ठेऊन ७० सेकंदासाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुमचा चॉकलेट मग केक खाण्यासाठी तयार.
गाजराचा मग केक Carrot mug cake
साहित्य ingredients- पाव कप मैदा, १ चमचा साखर, अर्धाचमचा दालचिनी पावडर, १ चिमूट जायफळ पावडर, अर्धा चमचा बेकींग पावडर, चिमूटभर मीठ, १ चमचा नारळाचं तेल, १ मोठा चमचा दूध, १ खिसलेलं गाजर
कृती- मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यासाठी योग्य अशा मगमध्ये मैदा, साखर, दालचिनी पावडर, जायफळ पावडर, बेकींग पावडर, मीठ एकत्र करुन घ्या. हे सगळं मिश्रण तेल आणि दूध घालून एकजीव करुन घ्या. सर्वात शेवटी खिसलेलं गाजर घाला आणि हे मिश्रण साधारण ९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा.
ब्लू बेरी मग केक Blue berry mag cake
साहित्य ingredients- २ मोठे चमचे बटर, अडीच चमचे साखर, २ मोठे चमचे दूध, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, अर्धा चमचा बेकींग पावडर, १ मोठा चमचा मैदा, ७-८ ब्लू बेरीज
कृती- सर्वात प्रथम बटर, साखर, दूध, व्हॅनिला इसेन्स हे सगळं एकत्र करा. नंतर त्यामध्ये बेकिंग पावडर आणि मैदा घाला. सर्वात शेवटी त्यामध्ये ब्लू बेरी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. हे मिश्रण एका मगमध्ये घालून सेट करा. मात्र हे मिश्रण अर्धा मगच भरा. कारण केक बनून तो थोडा फुलतो. हे मिश्रण साधारण ९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि अशाप्रकारे तुमचा केक तयार.
फनफेटी मग केक funfeti mag cake
साहित्य ingredients - पाव कप मैदा, २ चमचे साखर, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा बेकींग पावडर, पाव कप नारळाचं दूध, दीड कप नारळांचं तेल, २ चमचे स्प्रिंकल्स
कृती- सर्वात प्रथम मैदा, साखर, मीठ आणि बेकींग पावडर एकत्र करुन घ्या. यामध्ये हळूहळू दूध आणि तेल घाला. मिश्रण एकजीव होईपर्यंत एकत्र करत राहा. शेवटी मिश्रणात स्प्रिंकल्स घाला. मिश्रण साधारण ८०-९० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. केक तयार झाल्यावर त्यावर गार्निशिंगसाठी स्प्रिंकल्स घाला.
टीपः मायक्रोवेव्हमध्ये मग केक बनण्यासाठी साधारण ५० ते ९० सेकंद लागतात. जर ते केक व्यवस्थित न भाजल्यास १५ सेकंद आणखीन ठेवा.
kek recipe in marathi language
chocolate cake recipe in marathi language
veg cake recipe in marathi language
eggless cake recipe in marathi language
biscuit cake recipe in marathi language
cake recipes in marathi language book
healthy cake recipes marathi language
cake recipes in marathi language without oven
cake recipes in marathi language without oven video
No comments:
Post a Comment