मध आणि लिंबू - Honey and Lime - Madh and Limbu
कमाल लिंबाच्या शक्तीची
लिंबू आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे. गरम पाण्यात थोडंसं लिंबू पिळून तयार होणारं लिंबूपाणीही तितकंच लाभदायक आहे. त्याविषयी...
पचन क्रियेला मदत
सकाळी उठल्यावर एखाद्या लिंबाचा रस कोमट पाण्यासह रिकाम्या पोटी प्यायल्यास आंत्र जठर प्रक्रियेला उत्तेजन मिळतं. ही क्रिया नियमित केल्यास पचन क्रिया सुधारते आणि हृदयातील जळजळही कमी होते.
यकृताचं निर्विषीकरण
लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असतं. त्यामुळे यकृतातील प्रक्रिया सहज होण्यास मदत होते. तसंच यकृताचं निर्विषीकरण होण्यास उत्तेजन मिळतं.
पित्तासाठी गुणकारी
अनेकांना पित्ताचा त्रास होतो. पण लिंबू पाण्यामुळे पित्त कमी व्हायला मदत होते. लिंबाच्या रसात सायट्रिक अॅसिड असल्याने त्यातील पौष्टिक घटक आणि खनिज ही अल्कलाइन प्रकारात मोडतात. सायट्रिक अॅसिड हे जास्त प्रभावी अॅसिड नसून ते शरीरातून वेगळं करणं सहज शक्य आहे. लिंबाचा रस शरीरात कॅल्शिअम कार्बोनेट हे प्रभावी अॅसिड तयार होण्यास विशेष उत्तेजना देतं. चीज किंवा मटणासारख्या पचनास जड अशा पदार्थांच्या पचनाच्या वेळी हे अॅसिड कामी येतं. तज्ज्ञांच्या मते पीएच लेव्हल सांभाळण्यास आणि लघवीच्या इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी लिंबाचा रस उपयोगी असतो.
रोग प्रतिकारक शक्ती वाढते
लिंबू असलेले सर्व पदार्थांमध्ये विटामिन सी (क जीवनसत्त्व) मोठ्या प्रमाणात आढळतं. हे विटामिन (जीवनसत्त्व) आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते. लिंबामध्ये पोटॅशिअमही काही प्रमाणात आढळते. पोटॅशिअममुळे मेंदू आणि शरीराच्या चेता यंत्रणेला चालना मिळते. तर रक्तदाबही नियमित राहतो.
त्वचेसाठी उपयुक्त
तज्ज्ञांच्या मते लिंबातील व्हिटॅमिन सी (क जीवनसत्त्व) हे त्वचेसाठी अत्यंत चांगलं आहे. ते त्वचेत कोलाजेन तयार होण्यास मदत करते. यातील अॅन्टीऑक्सिडंट त्वचा पुनरुज्जीवित करतात आणि निरोगी ठेवतात. कोमट लिंबू पाण्यामुळे रक्तातलं टॉक्सीनचं प्रमाण कमी होतं. लिंबाचा रस त्वचेवरील डागांवर लावल्यास ते कमी होतात.
लिंबाच्या वापराचा अतिरेक करू नका. एका लिंबाच्या रसामुळे जर दोन किलो वजन कमी होण्यास मदत होत असेल तर चार लिंबाच्या रसाने अधिक वजन कमी होणार नाही, हे ध्यानात घ्या. लिंबामध्ये क्षार जास्त असल्याने त्याचं जास्त सेवन केल्यास, तुमच्या दातांना त्रास होऊ शकतो.
प्रत्येक वेळी लिंबू पाणी प्यायल्यावर साध्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवा. चूळ भरून टाका. यामुळे दातांना कोणताही त्रास होणार नाही.
लिंबू पाण्यात थोडंसं मध टाकून प्यायल्यास ते कफावरही गुणकारी ठरेल.
बाजारातून किंवा दुकानातून आणलेल्या लिंबू पाण्याच्या बाटलीतलं लिंबूपाणी कामाचं नाही. फक्त नैसर्गिक लिंबाचा रसच आरोग्याला चांगला असतो.
================
सुंदर त्वचेचं घरगुती रहस्य
रोजच्या दगदगीच्या आयुष्यात स्वतःच्या त्वचेची काळजी घेणं अगदी गरजेचं होऊन बसतं. त्यात रोजच्यारोज पार्लरला जाणं काही शक्य नसतं. शिवाय सतत कृत्रिम साधनांनी सौंदर्य वाढवणं हे फारसं चांगलंही नव्हेच. म्हणूनच आज काही 'होममेड फेसपॅक'बद्दल. आपला खिसा आणि त्वचा दोन्हीला आवडतील असे हे फेसपॅक करून बघाच.मध : हातात फार कमी वेळ असेल तर हे मधाचं फेसपॅक तुमच्यासाठी अगदी योग्य ठरेल. चेहऱ्यावर एकसमान मध लावा आणि पंधरा मिनिटांनंतर एक कपडा पाण्यात बुडवून, पिळून चेहरा पुसून घ्या. जर त्या मधात तुम्ही सुकवलेल्या संत्राच्या सालांची पावडर करून घातलीत तर तुमची त्वचा आणखीनचं तुकतुकीत दिसेल.
चविष्ट पपईचं फेसपॅक : पपईचा पल्प घ्या, त्याला कुस्करा आणि त्यात दूध घाला. हळू-हळू सर्व मिश्रण ढवळा आणि त्याची पेस्ट करा. मग ती पेस्ट चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने तो फेसपॅक धुवा. आणि मग तुमच्या चेहऱ्यावर आलेलं तेज काही आगळंच असेल.
बदाम आणि दुधाचा फेसपॅक : तीन ते चार बदाम दुधात भिजत ठेवा. थोड्या वेळाने त्याची सालं काढून ते सर्व बदाम मिक्सरला लावा. त्या पावडरमध्ये हळू-हळू दूध घालून त्याची जाडसर पेस्ट बनवा. दुसरी पद्धत म्हणजे बदामाच्या तेलात मलई घालून त्याला चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. तेलकट त्वचा असलेल्यांनी हा फेसपॅक टाळावा.
चंदन-गुलाबपाणीचं फेसपॅक : चंदन आणि गुलाबपाणी यांची पेस्ट बनवा. प्रथम आपला चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. तो एका कापडाने टिपून घ्या. चेहरा पूर्णतः कोरडा झाल्यावर त्यावर हा बनविलेला फेसपॅक लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. त्यामुळे तुमचा चेहरा स्वच्छ होतो. तुम्ही उन्हातून, दगदगीतून घरी आल्यावर हा फेसपॅक नक्की लावा. तुमची त्वचा तर स्वच्छ होईलच पण त्या सोबत तुम्हाला थंडही वाटेल.
बेसन-दह्याचं फेसपॅक : तीन ते चार चमचे बेसन, तितक्याच प्रमाणात दही आणि त्यात दोन चमचे मध. या सर्व मिश्रणाची पातळ पेस्ट बनवा आणि ती चेहऱ्यावर समप्रमाणात लावा. पंधरा मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा. जेणेकरून बेसन आणि दह्यामुळे त्वचा उजळून निघेल आणि मध तुमची त्वचा मॉईश्चराइज करेल.
तेलकट त्वचेसाठी फेसपॅक
मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणीः मुलतानी मिट्टी आणि गुलाबपाणी यांना एकमेकात मिसळून त्याची पेस्ट बनवा आणि ती आपल्या चेहऱ्यावर लावा. हा फेसपॅक तेलकट त्वचेसाठी सर्वात उत्तम ठरतो. बाजारात मुलतानी मिट्टी अगदी आरामात उपलब्ध होईल. आणि त्यात हा फेसपॅक बनवायला वेळही लागत नाही.
टॉमेटो, लिंबू आणि मधः एका वाटीत टॉमेटोचा बल्क घ्या, त्यात दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस घ्या. या सर्व मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. दहा ते पंधरा मिनिटे झाल्यावर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. टॉमेटो आणि लिंबू तुमची त्वचा उजळवायला मदत करेल तर मध तुमच्या चेहऱ्यावर तजेला आणेल.
लिंबू आणि दुधः एका वाटीत तीन चमचे दूध, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन छोटे चमचे हळद घाला आणि त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावून पंधरा मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरचा तेलकटपणा जाईल.
संत्र-लिंबू आणि मधः संत्र्याच्या सुकलेल्या सालींची मिक्सरला लावून पावडर बनवा; त्यात लिंबाचा रस आणि मध घाला. त्याची ढवळून जाडसर पेस्ट तयार करा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. जवळपास वीस मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा नीट धुवा. हा फेसपॅक तुम्हाला नक्कीच उत्तम परिणाम देईल.
काकडी आणि लिंबूः काकडीमुळे त्वचा तर उजळतेच. पण तुमच्या त्वचेवरचा टॅन घालवायलाही मदत करेल. काकडीचा एक चमचा रस एका वाटीत घ्या. त्यात एक चमचा मध आणि एक चमचा हळद घाला. या मिश्रणाची पेस्ट बनवा आणि आपल्या चेहऱ्यावर लावा. हे मिश्रण डोळ्यांभोवती आवर्जून लावा कारण त्यामुळे डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळ कमी होतात. पंधरा मिनिटांनी पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक तुम्ही रोज वापरल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसेल.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बरेच उपाय करत असतो. पण घरच्याघरी करता येतील, असेही काही उपाय आहेत. काही घरगुती फेसपॅकबद्दल...
लिंबू आणि कोरफड
लिंबाचा रस आणि कोरफडीच्या पानांचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने स्कीन टॅन कमी होतं.
दही आणि बेसन
दही आणि बेसनाचं मिश्रण चेहऱ्यावर आणि हातांवर वगैरे लावावं. ते सुकल्यावर गरम पाण्याने धुवून टाकावं. त्यामुळे त्वचा मऊ आणि तेजस्वी होते.
चंदन आणि गुलाबपाणी
सनबर्नपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी हे उत्तम मिश्रण आहे. हा फेसपॅक लावल्याने ताजंतवानंही वाटेल.
मध आणि हळद
मध आणि हळदीचं मिश्रण करून लावल्यास त्वचेवर खूप चांगले परिणाम दिसतील. कारण हे एक उत्तम घरगुती मॉइश्चरायझर आहे.
=====================
थंडा मतलब...!
उन्हाळ्याच्या या दिवसांत आइस्क्रीम, मिल्कशेक्स, थंडपेय याची अगदी रेलचेल असते. रोजच्या रोज न चुकता आइस्क्रीम खाणारेही अनेक खवय्येही आहेत. दर उन्हाळ्यात कोणती ना कोणती नवी चव आपल्या जिभेला खुणावत असते. यंदा कोणत्या नवनव्या चवी आणि स्वाद बाजारात आलेत त्यावर एक नजर...
मिल्कशेकचा पहिला घोट, सरबताचा पहिला थेंब आणि जिभेवर एंट्री घेताक्षणी गारेगार करून टाकणारं आइस्क्रीम.... डोक्यावरचं ऊनही बघता बघता या थंडगार चवीत विरघळून जातं. यंदाच्या उन्हाळ्यात या थंडाव्याला कोणते स्वाद मिळालेत त्याची एक झलक...
रंग शरबतोंका..
उन्हाळ्यात थंडावा मिळवण्यासाठी सगळ्यात सोप्पा मार्ग म्हणजे सरबतं. कैरी पन्हं, ताक, लिंबू सरबत, लस्सी अशा देशी सरबतांबरोबरच यंदा बऱ्याच परदेशी पाहुण्यांनी या शरबती विश्वात प्रवेश केला आहे. मोयितो, फ्रुट पंच, स्मुदीसारखी सरबतं यंदा बाजारात दिसून येतायत.
मोयितोची जादू
मोयितो हे एक स्पॅनिश पद्धतीचं सरबत आहे. यात व्हाईट रम असते. आपल्याकडे मात्र क्लब सोडा घालून मोयितो बनवतात. पुदिना, आंबा, स्ट्रॉबेरी, ब्लुबेरी, लिची, संत्र अशा बऱ्याच स्वादांमध्ये मोयितो उपलब्ध आहेत. घरच्या घरीही तुम्ही हे मोयितो बनवू शकता.
साहित्य - १० ते १२ पुदिन्याची पाने, ४ ते ५ क्लब सोडा, ५ चमचे लिंबाचा रस, ५ ते ६ चमचे बर्फाचा क्रश, १ चमचा जलजीरा, अर्धा चमचा आलं, ५ चमचे साखरेचा पाक, पाणी आणि मध थोडंसं उकळून घ्या. मिश्रण घट्ट होत असताना पाक झाला असं समजावं.
कृती - एका ग्लासामध्ये पुदिन्याची पानं, क्लब सोडा, जलजीरा, साखरेचा पाक, लिंबाचा रस, आलं एकत्र करून घ्या. हे सगळं लाकडी चमच्याने ठेचून घ्यावं. ते करताना पुदिन्याची पानं खूप वाटली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. सरतेशेवटी यात बर्फाचा चुरा आणि पाणी घालावं. लिंबाच्या चकत्या आणि पुदिन्याची पानं लावून सजवावं.
आइस्क्रीमची ओढ
उन्हाळा आणि आइस्क्रीम हे एक अतूट नातं. सध्या मात्र आइस्क्रीमच्या चवीमध्ये अनेक नवनवे स्वाद आलेले दिसतात. आंबा, व्हॅनिला, चॉकलेट, पिस्ता बदाम अशा नेहमीच्या चवींखेरीज मसाला पान, गुलकंद, मिरचीपर्यंत निरनिराळ्या चवीची आइस्क्रीम चाखायला मिळतील. यासोबतच थंडाई, राजभोग, गुलकंद असे स्वाद आहेत. तर फळांमध्ये आंब्याव्यतिरीक्त चिकू, नारळ, कलिंगड, पपई, सीताफळ, लिची, अननस, अंजीर, फणस, जांभूळ, कच्ची कैरी, टरबूजापर्यंत अनेक निरनिराळ्या चवी आपल्या जिभेच्या स्वागतासाठी सज्ज झाल्या आहेत. यासोबतच तीन चार फ्लेवर्स एकत्र करून दिलं जाणारं गडबड आइस्क्रीम, किंवा दह्याचं बनलेलं योगर्ट आइस्क्रीम खाणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
मिल्कशेकची जादू
आइस्क्रीमनंतर नंबर लागतो तो मिल्कशेकचा. घरातून बराच काळ बाहेर असताना कधीकधी भूकही लागते आणि तहानही. हे दोन्ही भागवणारा हुकुमी एक्का म्हणजे मिल्कशेक. इतर वेळी दुधाला नाकं मुरडणारी मंडळी तेच दूध मिल्कशेकच्या रुपात आल्यावर मात्र अगदी आवडीने गट्टंम करतात. मिल्कशेकमध्येही आता एकदम भन्नाट स्वाद येऊ लागलेत. बडीशेप, कॉफी, स्ट्रॉबेरी, किवी विथ स्ट्रॉबेरी, मिल्कशेक विथ क्रश्ड क्रीम अशा निरनिराळ्या हटके प्रकारांची चलती आहे. सोबतच रबडी, बासुंदी, बनाना मिल्क, अंजीर, रासबेरी, ड्रायफ्रुट बेस मिल्कशेकसारख्या जुन्या प्रकारांनाही खवय्यांची पसंती आहेच. आइस्क्रीम आणि चॉकलेट बेस मिल्कशेकसुद्धा आहेतच. आइस्क्रीम किंवा चॉकलेट बेस्ड मिल्कशेकमध्ये आंब्याचे तुकडे किंवा आंब्याच्या रसाचा कल्पक वापर करून निरनिराळे मिल्कशेकचे प्रकार बनवले जात आहेत. याशिवाय दोन वेगवेगळ्या प्रकारचे मिल्कशेक एकत्र करून तयार केले जाणारा फ्युजन मिल्कशेकही खवय्यांची पसंती मिळवत आहेत.
रसायन
रसायन हा थोडा वेगळा प्रकार आहे. अगदी ३०-३५रुपयांपासून ते ४००रु. पर्यंत किंमतीत तो तुम्हाला मिळू शकतो. दक्षिण मुंबईमध्ये तर तो खूप जास्त लोकप्रिय आहे. या प्रकारात केळ हे मुख्य फळ आणि सोबत इतर ४-५प्रकारची फळं घातलेली असतात. रस्त्यावरच्या गाडीपासून ते चकाचक मॉलपर्यंत बऱ्याच ठिकाणी हा पदार्थ चाखायला मिळू शकतो.
आइस्क्रीम केक
वॉलनट ब्राऊनी बरोबर व्हॅनिला आइस्क्रीम अनेकांनी खाल्लं असेल. पण या उन्हाळ्यात वेगवगेळ्या स्वादाच्या केकबरोबर वेगवेगळी आइस्क्रीम्स चाखणा-यांची संख्या वाढल्याने विक्रेत्यांनी आइस्क्रीम केक हा नवीन प्रकार उपलब्ध करुन दिला आहे.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण पावसाच्या धारा अंगावर घेण्यासाठी आतुर असतात. पावसाने हजेरी लावली की सगळ्यांच्या आनंदाला उधानच येतो. या पावसात भिजल्यानंतर कितीही मज्जा आली तरी नंतर काही आजार होण्याची भिती असते, त्यामुळे चला पाहूयात अशा आजारांपासून बचाव करण्याचे काही घरगुती उपाय ...
आलं- एक आल्याचा तूकडा घेऊन तो पाण्यात उकळा त्यात लिंबू आणि मध घालून प्या.
मध- मध हे 'अॅन्टीऑक्सीडंट'ने परिपूर्ण असते. कफ झाला असल्यास किंवा घसा दूखत असल्यास एक चमचा मध आणि लिंबाचा रस कोमट पाण्यात मिसळून प्यायल्यास आराम मिळतो.
कडूलिंब
व्हायरल इनफेक्शन झाल्यास कडूलिंबाची १०-१२ पाने उकळून घ्या आणि दिवसातून २-३ वेळा याचे सेवन केल्यास तुमची इम्यूनीटी पॉवर वाढण्यास मदत होईल.
============
आरशात बघायला आवडत नाही, अशी ना मुलगी आढळेल ना स्त्री. आपले सौंदर्य अधिक खुलून दिसावे, यासाठी 'सजना हैं मुझे'ची ओढ प्रत्येकीलाच असते. केसांची निगा राखण्यासाठी रोज मसाज करणे, तसेच हिरव्या पालेभाज्या खाणे, केसांच्या मुळांना तेलाची मालिश करणे असे विविध उपाय सुचविले. केस धुताना हर्बल शाम्पू, आवळा किंवा शिकेकाई यांचा वापर करावा.
त्वचेची घ्या रोज काळजी
कोरडी, तेलकट आणि सामान्य त्वचेचे सौंदर्य जपण्यासाठी डवरे यांनी विविध उपाय सांगितले. तेलकट त्वचा असल्यास मुरूम येण्याचा धोका असतो. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून तीन ते चार वेळा आपला चेहरा धुवावा, अशी सूचना त्यांनी केली. चेहरा साफ करण्यासाठी दही, ताक, मध किंवा साखर अशा पदार्थांचा वापर करावा. ब्लिचिंग करण्यासाठी मसूर डाळ, मध आणि टोमॅटो ज्यूस यांचे मिश्रण वापरावे, असे हर्बल उपायदेखील त्यांनी सुचविले. या कार्यशाळेला नागपूरकर महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
टिप्स सौंदर्याच्या
केसातील कोंडा घालविण्यासाठी वापरा मध आणि लिंबू किंवा दही.
चेहरा स्वच्छ करण्यासाठी करा स्टीमचा वापर.
जास्त तेलकट खाऊ नका.
मेकअप करण्यापूर्वी वापरा मॉइश्चरायजर आणि मेकअप काढण्यासाठी क्लिन्सिंग मिल्क.
घराबाहेर पडण्याच्या १५ मिनिटे अगोदर लावा सनस्क्रीम लोशन.
तेलकट त्वचेसाठी वापरा वॉटरप्रूफ मॉइस्चरायजर
==========
थंडीच्या दिवसात महागडी सौंदर्य उत्पादनं वापरण्यापेक्षा काही सोप्या गोष्टी करूनही त्वचेची काळजी घेता येते.
१) चणाडाळ, उडीद डाळ, मसूर डाळी यांचं पीठ एकत्र करून त्यात पाणी आणि खडे मीठ घालून ते विरघळवून लावावं. यात साध्या पाण्याऐवजी दह्याचं पाणीही वापरता येईल.
२) ज्यांची त्वचा मुळातच कोरडी आहे, त्यांची त्वचा थंडीमध्ये जास्त सुरकुतलेली दिसते. अशांनी मध आणि लिंबू रस किंवा साखर आणि लिंबू रसानं स्क्रब करावं.
३) थंडीमुळे कडक गरम पाण्यानं आंघोळ करण्याची सवय अनेकांना असते. मात्र, त्यामुळे चेहऱ्यावरील उघड्या छिद्रांना हानी पोहोचून नवीनच समस्या उद्भवू शकते. सर्दी झाल्यावर वाफ घेतानाही ती अतिप्रमाणत घेतल्यास अशीच अडचण होते. यासाठी पाणी खूप कडक असू नये.
४) खोबरेल तेल, अॅरोमा किंवा तिळाच्या तेलानं मसाज करून आंघोळ करणं हा उपाय सर्वोत्तम आहे. तेवढा वेळ नसल्यास आंघोळीच्या पाण्यातच यापैकी कुठलंही तेल थोड्या प्रमाणात घालावं. म्हणजे त्वचेचं आपोआप मॉइश्चरायझिंग होतं.
५) रात्री बदाम भिजवून, सकाळी त्याची सालं काढून, पेस्ट करून ती संत्र्याच्या रसात मिक्स करून लावावी.
६) आंघोळीआधी त्वचेला पंचामृत लावल्यानंही त्वचेला मॉइश्चर मिळतं.
No comments:
Post a Comment