Saturday, December 24, 2016

10:56 PM

Balaji Tambe Upay

शरीर हे महत्त्वाचे साधन आहे. शरीराचे आरोग्य टिकविण्याचे मार्गदर्शन केलेले आहे ते आयुर्वेदशास्त्र सर्वांत महत्त्वाचे समजले जाते. वेदांमध्ये वनस्पती किंवा औषधाला "ओषधि‘ शब्द वापरला आहे. ओष्‌ म्हणजे वेदना. त्यामुळे वेदना किंवा दुःख दूर करणारी ती ओषधि. औषधीला वेदात माता असेही म्हटलेले आहे.

"आयुर्वेद‘ या शब्दातच वेद आहे. आयुष्यावरची सर्व माहिती ज्यात आहे तो आयुर्वेद. कसे जगावे, कसे वागावे, रोग होऊ नयेत म्हणून काय करावे, रोग झाल्यावर काय करावे, समाजात राहताना काय काळजी घ्यावी वगैरे अगणित विषयांचे समर्पक वर्णन आयुर्वेदात केलेले आहे. या आयुर्वेदशास्त्राची मुळे सापडतात ती वेदवाङ्‌मयात.


अनुत्पाद्यैव प्रजा आयुर्वेदं एव अग्रे असृजत्‌ ।...सुश्रुत सूत्रस्थान 1
सृष्टी उत्पन्न होण्यापूर्वी "ज्ञान‘ अस्तित्वात आले असे भारतीय शास्त्रे सांगतात. सुश्रुत संहितेतही आयुर्वेद अगोदर उत्पन्न झाला आणि त्यानंतर प्रजा (पशु-पक्षी-वनस्पती) अस्तित्वात आली असा उल्लेख आहे.

ज्याप्रमाणे बालकाचा जन्म होण्यापूर्वीच मातेमध्ये "स्तन्य‘ तयार होते, त्याप्रमाणे मनुष्य किंवा सृष्टी तयार होण्यापूर्वी परमात्म्याने जीविकेसाठी आवश्‍यक साधने तयार केली. या साधनांमध्ये आयुर्वेदाचा समावेश असल्यामुळे आयुर्वेद हे वेदाचे उपांग समजले जाते.
शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्‌ ।

शरीर महत्त्वाचे साधन असल्यामुळे "आयुर्वेद‘ ज्यात शरीराचे आरोग्य टिकविण्याचे मार्गदर्शन केलेले आहे ते शास्त्र सर्वांत महत्त्वाचे समजले जाते. काश्‍यपसंहितेतसुद्धा म्हटले आहे की एका हातात चार बोटे व पाचवा अंगठा असतो. तो इतर बोटांपेक्षा आकाराने, ठिकाणाने वेगळा असतो व इतर बोटांवर शासन करतो. त्याप्रमाणे आयुर्वेदसुद्धा चारही वेदांमध्ये मुख्य आहे.

वेदांमध्ये इंद्र, अग्नी व सोम देवतेनंतर "अश्विनौ‘ यांची गणना केलेली आढळते. आयुर्वेदात अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य आहेत असे सांगितले आहे. वेदामध्ये वैद्याची लक्षणे पुढीलप्रमाणे सांगितली आहेत.

यत्रौषधीः समग्मत राजानः समितामिव । विप्रः स उच्यते भिषग्‌ रक्षोहामीवचातनः ।।

- सर्व औषधे आपल्या जवळ ठेवणारा
- आपल्या शास्त्राचे संपूर्ण ज्ञान असणारा
- युक्‍ती आणि योजना कशी करावी हे जाणणारा
- राक्षसांचा नाश करण्यास समर्थ असणारा (या ठिकाणी राक्षस म्हणजे सूक्ष्म जीवजंतू-जीवाणू व विषाणू वगैरे)
- रोग मुळापासून बरा करणारा
कृमी किंवा जीवजंतूंना वेदामध्ये राक्षस, असुर, यातुधान हे शब्द वापरले आहेत. सुश्रुत संहितेतही त्यांना निशाचर, रक्ष म्हटलेले आहे. कृमी व राक्षस या दोघांमध्ये पुढील साम्य असते,
- दोघे अंधारात किंवा रात्रीच्या वेळी आक्रमण करतात. त्यांना प्रकाश आवडत नाही.
- दोघे सूर्यप्रकाशापासून दूर पळतात.
- धूम-यज्ञाला घाबरतात.
- दोघांनाही मांस आणि रक्‍त प्रिय असते. यांच्यावरच आक्रमण करतात.
- दोघेही रूप बदलत राहतात.

वेदांमध्ये वनस्पती किंवा औषधाला "ओषधि‘ शब्द वापरला आहे. ओष्‌ म्हणजे वेदना. त्यामुळे वेदना किंवा दुःख दूर करणारी ती ओषधि. औषधीला वेदात माता असेही म्हटलेले आहे.

ऋग्वेदात औषधी वनस्पतींबद्दल म्हटले आहे,
औषधयः संवदन्ते सोमेन सह राज्ञा । यस्मै कृणोति ब्राह्मणस्तं राजन्‌ पारयामसि ।।...ऋग्वेद 10-19-22
ओषधि "सोम‘ राजाला म्हणते, हे राजन्‌, ब्रह्मज्ञान असणारा जो वैद्य रोग्यासाठी आमची योजना करतो, त्या रोग्याचा रोग आम्ही पार करतो म्हणजे बरा करतो.

वेदांमध्ये निसर्गातील तत्त्वांना देवता संबोधले आहे आणि त्यांना आरोग्यासाठी प्रार्थना केली आहे.
रुत्‌ - हे बलशाली मरुत्‌ देवांनो, तुमची जी कल्याणकारी, पवित्र व सुखदायी औषधी आहेत, त्यांची आम्ही इच्छा करतो आहोत. 
जल - जलामध्ये सर्व औषधी समाश्रित आहेत, हे जल देवांनो, जीवनरक्षक औषधींना आमच्या शरीरात स्थित करावे. 
सूर्य - उदय होणारा सूर्य कृमींचा नाश करो. 
आरोग्यं भास्करात्‌ इच्छेत्‌ म्हणजे सूर्याकडून आरोग्याची कामना करावी. म्हणून पूर्वीपासून सूर्याला अर्घ्य देण्याची प्रथा आहे. रक्‍ताची कमतरता सूर्यकिरणांमुळे दूर होते आणि रक्‍त कमी झाले की त्वचेचा रंग हिरवा-पिवळा होतो आणि त्यासाठी सूर्यकिरणे उत्तम असतात असे अथर्ववेदात सांगितले आहे. आजही कावीळ वगैरे विकारांमध्ये अल्ट्राव्हायोलेट किरणांचा वापर करण्याची पद्धत आहे.

वेदात हृदयरोग व कावीळ या रोगांचा स्पष्ट उल्लेख आहे. या दोहोंची चिकित्सा सूर्यकिरणांनी होते. 
वायू - हे वायू तू सर्व ओषधींनी युक्‍त असा आहेत. तू सर्व औषधे आण आणि आमचे सर्व दोष दूर कर.
वेदांमध्ये प्राण व अपान या दोघांचा उल्लेख आहे. प्राण शरीरात बल आणतो. अपान शरीरातून पाप व रोगांना बाहेर काढतो.

अथर्ववेदांत उल्लेख असलेल्या वनस्पती 
पिंपळी-पिंपळी म्हणते की जो मनुष्य आमचा उपयोग करतो तो कधी नष्ट होत नाही. पिंपळी वातरोग, उन्माद, अपस्मार यावर उत्तम ओषधि आहे.
अपामार्ग (आघाडा) - क्षुधा, तृष्णा, अनपत्यता यावर उपयुक्‍त.
पृश्निपर्णी - हे पृश्निपर्णी, तू न दिसणाऱ्या, रक्‍त पिणाऱ्या, उन्नतीला थांबविणाऱ्या, गर्भाची वाढ होऊ न देणाऱ्या रोगाचा नाश कर.
याशिवाय पिंपळ, वड, अर्जुन, काकडशिंगी, रोहिणी वगैरे वनस्पतींचा वेदांमध्ये उल्लेख सापडतो.
वेदांमध्ये रोगांचा उल्लेख - शिरःशूळ, कर्णशूळ, रक्‍ताची कमतरता, ज्वर, राजयक्ष्मा, शिरोरोग, विषबाधा, गंडमाळा, कृमी, कामला वगैरे रोगांचा उल्लेख.

वेदात रोगप्रतिकाराचे-उपचाराचे वर्णन-व्रण धुण्यासाठी मिठाचे पाणी, हृद्रोगावर हिमालयातील नद्यांचे पाणी, लघवी अडली असेल तर मूत्रमार्गातून कापराचे चूर्ण सरकवणे वेदांमध्ये "शिर‘ महत्त्वाचे समजलेले आहे. इतर सर्व शरीरावयवांपेक्षा शिर सर्वांत श्रेष्ठ म्हटलेले आहे. शिरालाच "देवकोश‘ म्हटलेले आहे. अ-थर्व म्हणजे स्थिरचित्त. स्थिरचित्त योग्याने डोक्‍यातील मस्तिष्काच्याही वर आपल्या प्राणाला स्थिर करणे म्हणजे अ-थर्व होणे. असे जे अ-थर्व शिर आहे, ते देवकोश असे. याची रक्षा प्राण, अन्न आणि मनाद्वारा होत असते.


अथर्ववेदात पुरुषशरीराचे (स्त्री किंवा पुरुष) "अयोध्या‘ रूपात वर्णन केलेले आहे. 
न योद्धुं शक्‍या अयोध्या म्हणजे ज्याच्याशी कोणीही लढू शकत नाही ती अयोध्या. अयोध्यानगरीमध्ये आठ चक्र, नऊ द्वारे आहेत. ही देवतांची नगरी आहे आणि हिच्यात हिरण्यकोश (सोन्याचा कोश) आहे. हे मनुष्यशरीरालाही लागू पडते. यात मूलाधारादी चक्र आहेत, दोन डोळे, दोन कान, दोन नाकपुड्या, मुख, जननेंद्रिय आणि गुद ही नऊद्वारे आहेत. यात इंद्रिये, मन, चंद्र, प्रजापती वगैरे देवता राहात आहेत. याच्यात ज्ञानरूपी हिरण्यकोष आहे. शरीरच याप्रकारे अयोध्या आहे, कोणताही रोगरूपी शत्रू या नगरीशी लढू शकत नाही.
10:25 PM

Shriguru Balaji Tambe

ध्यानी-मनी नित्‍य श्री दत्त हेचिं नाम


श्री सद्‌गुरू दत्तात्रेय यांचे नित्य ध्यान करायचे, तर ध्यानप्रतिमाही योग्यच हवी. त्या ध्यानाने भक्तांना लाभ मिळायला हवा. ही योग्य ध्यानप्रतिमा कोणती? दत्तजयंतीनिमित्त याविषयीची चर्चा  
श्रीदत्तात्रेय हे गुरूंचे सद्‌गुरू, परमगुरू आहेत. योगेश्वर आहेत. श्रीदत्तगुरूंचे बंधू आहेत चंद्रमा. म्हणजे श्रीदत्तगुरू यांचा जन्म कोणत्या युगात झाला असेल याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. ही सृष्टी त्रिगुणात्मक आहे. तीन भाव, तीन देवता आहेत. या सृष्टीचे एक सरळ सूत्र आहे. पहिल्यांदा कोणत्याही गोष्टीची निर्मिती होते. ही निर्मिती करतात ब्रह्मदेव. कोणतीही संकल्पना आपल्या मेंदूत तयार होते आणि तेथेच त्याचे सृजन होते. या सृजनाची देवता आहे ब्रह्मा. आपल्या शरीरातील मेंदू हा या सृजनव्यवहाराच्या केंद्रस्थानी असतो. ब्रह्माचे ते स्थान. जीवन हे नेहमी वर्तमानकाळात चालते आणि त्याची देवता आहे विष्णू. मेरूदंड हे विष्णूचे स्थान. पूर्ण चलनवलन व्यवस्था तेथून चालते. सर्व प्रकारचे चलनवलन हे विष्णूदेवांच्या नियंत्रणात चालते. एकदा प्रवास सुरू झाला की कुठेतरी पोचायचे असते. मनुष्याला मोक्षप्राप्ती करायची असते. त्यासाठी हे शरीर सोडावे लागतेच. या जीवनाला उत्क्रांत करीत सूक्ष्म रूपात पुढे जायचे असते. हे कार्य करणारी देवता आहे शिव. उत्पत्ती-स्थिती-लय ही जीवनाची तीन अंगे आहेत. ब्रह्मा-विष्णू-महेश या त्यांच्या देवता आहेत. तशीच तीन शास्त्रेही आहेत. वेद म्हणजे विश्वाचे ज्ञान, आयुर्वेद म्हणजे आरोग्याचे ज्ञान आहे. म्हणजेच या शरीराच्या व निसर्गाच्या असलेल्या संबंधाचे ज्ञान आहे. तिसरे आहे वैराग्य. राग म्हणजे इच्छा. सर्व इच्छा-आकांक्षांच्या पूर्तीनंतर आता सर्व इच्छा-आकांक्षांच्या पार गेल्यावर येते ते वैराग्य. येथेही ब्रह्मा-विष्णू-महेश आहेत. विश्वाचे ज्ञान झाले की मनुष्य दान देतो. आरोग्याचे ज्ञान झाले की आपल्या शरीराची तो काळजी घेऊ शकतो. जो योगाचा अभ्यास करील त्याला योगेश्वर शिव प्रसन्न होतील. मुक्तीचे रूप दाखवतील. ही तीन वेगवेगळी रूपे आहेत. त्या तिघांनाही एकत्र असे आपल्याला पाहायचेय. आपल्यात एकत्र आणायचेय. ते कार्य करतात त्रिगुणरूप श्रीदत्तात्रेय. अनसूया-अत्रिनंदन श्रीदत्तात्रेय हे सर्व मानवजातीला कलियुगात तारणारे असे एकमेव सद्‌गुरू. ज्ञानदानाची परंपरा ज्या सद्‌गुरूंनी आपल्या सर्व अंशात्मक गुरूंमार्फत चालविली ते हे श्री सद्‌गुरू दत्तात्रेय. यांच्या ध्यानाचे दोन श्‍लोक अधिक प्रचलित आहेत. पहिला श्‍लोक आहे,
मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे
मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले ।
यस्य स्त ऊर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे 
वन्दे तमत्रिवरदं भुजषट्‌कयुक्‍तम्‌ ।।
डोळे मिटल्यानंतर श्री सद्‌गुरूंचे ध्यान डोळ्यांसमोर यावे म्हणून काही व्यक्‍तींना समोर चित्रे किंवा मूर्तीची आवश्‍यकता असते. श्री दत्तात्रेयांची अनेक चित्रे उपलब्ध आहेत. माझ्या मते, देवाला शरीररूपाने चित्रात दाखवायचे असले तर ते चित्र शरीरशास्त्राप्रमाणे सुदृढ, संतुलित शरीराची जी काही मापे ठरलेली आहेत त्यानुसार असावे. तसेच कुठल्याही देवतेचे ध्यान करत असताना त्यांची अनुकंपा, कृपा व दया आपल्याला लाभते आहे असा भाव त्यांच्याही चेहऱ्यावर असावा आणि देवतेच्या त्या चित्राकडे प्रेमाने व अत्यंत आदराने पाहून ध्यान करता यावे. श्री दत्तात्रेयांच्या चित्रात कधी मधल्या किंवा कधी बाजूच्या एका डोक्‍यावरून गंगा वाहत असते. मध्यभागी असलेली देवता कधी विष्णू, कधी ब्रह्मा तर कधी शंकर असते. पण ‘मालाकमण्डलुरधः करपद्मयुग्मे’ या उक्‍तीनुसार विचार करता माला व कमंडलू ही साधने दत्तात्रेयांनी खालच्या हातात धारण केलेली आहेत. ही दोन्ही साधने श्री ब्रह्मदेवांची असल्यामुळे मध्यभागी श्री ब्रह्मदेवांचे शिर असावे लागेल. त्यानंतर एका बाजूला शंकर व एका बाजूला विष्णू अशाप्रकारे देवता दाखवाव्या लागतील. चित्र पाहणाऱ्याच्या उजव्या हाताला श्री शंकर व डाव्या हाताला श्री विष्णू देवता आहेत असे धरले व त्यांचे हात व्यवस्थित दाखवले तर ‘मध्यस्थपाणियुगुले डमरूत्रिशूले’ या उक्‍तीनुसार मधल्या हातांमध्ये शंकरांचे डमरू व त्रिशूल दाखवता येतात व वरच्या दोन हातांमध्ये शंख व चक्र दाखविता येतात. अशाप्रकारे ध्यान असणारे चित्र उत्तम व योग्य असते असे वाटते व तशाप्रकारे ध्यान करणाऱ्यांचे अनुभव खूप चांगलेही आहेत. श्री दत्तगुरूंची मूर्ती किंवा चित्र हवे असले की आपण सहसा तीन शिरे असलेली कुठलीही मूर्ती किंवा चित्र फ्रेम करून आणतो, परंतु प्रत्येक देवतेच्या स्वरूपाचा विचार करणे आवश्‍यक आहे. देवतेविषयी विकार उत्पन्न होईल असा आकार किंवा भाव चित्रामध्ये किंवा मूर्तीमध्ये कदापि नसावा. श्री दत्तात्रेयांच्या ठिकाणी असणारे प्रेम व्यक्‍त व्हावे म्हणून आणि सद्‌गुरू ही तिन्ही देवतांच्या वर असणारी शक्‍ती आहे यासाठी कलियुगात त्यांची उपासना केली असता, ‘स्मर्तृगामी स माऽवतु’नुसार म्हणजे आठवण केल्याक्षणी सद्‌गुरू आपल्याला मदत करणार असतील, तर त्यांचे ध्यान करता यायला हवे. श्री दत्तात्रेयांच्या ध्यानाचा दुसरा एक श्‍लोकही प्रसिद्ध आहे.
काषायवस्त्रं करदण्डधारिणं 
कमण्डलुं पद्मकरेण शंखम्‌ ।
चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं 
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ।।
या ठिकाणी कमंडलू व पद्म श्री ब्रह्मदेवांचे, दंड / त्रिशूल व गदा ही श्री शंकरांची (यातील गदा शिव-अंश असलेल्या श्री मारुतीरायांजवळ पाहायला मिळते) आणि शंख व चक्र श्री विष्णूंची आहे. हे ध्यान श्री विष्णूप्रधान (मध्ये विष्णू असलेले) आहे. कारण गदा व दंड बाजूने हातात धरले तरी ते चित्र संतुलित असू शकते. मुख्य म्हणजे श्री दत्तात्रेय ही देवता तीन शिरे असलेली आहे व खाली शरीर मात्र एकच आहे. शरीर एक आहे, पाय दोन आहेत तरी हात मात्र सहा आहेत. शरीराची अशा तऱ्हेची रचना चित्रात दाखविता येणे खूप अवघड आहे. प्रत्येक देवतेच्या दोन मुख्य कार्यशक्‍ती चित्रात समाविष्ट करण्यासाठी सहा हात दाखविले आहेत. मात्र, शक्‍तिपाताचार्य योगिराज गुळवणी महाराजांनी एकमुखी दत्ताचे चित्र काढून त्याचा प्रसार केला. अर्थात, श्री दत्तात्रेयांचे कुठलेही चित्र पाहताना बाजूची दोन शिरे पाहण्यापूर्वी प्रथम लक्ष मधल्या शिराकडेच जाते. श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा चित्र पाहात असताना त्यांचे सहाही डोळे दिसणे अपेक्षित असते, केवळ दोन वा चार डोळे दिसणे तितकेसे बरोबर नाही. तेव्हा श्री दत्तात्रेयांची शिरे अशा तऱ्हेने दाखविली पाहिजेत की तिन्ही देवतांचे डोळे पूर्णपणे दिसावेत. असे असले तरच चित्र किंवा मूर्ती पूर्णांशाने बरोबर असेल. यामध्ये कुठल्याही प्रकारे भगवान श्री सद्‌गुरू दत्तात्रेयांविषयी गैरसमज होऊ नये, परंतु सर्व भक्‍तांना लाभ मिळावा, या दृष्टीने लेखनाचा हा प्रपंच केलेला आहे.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.

श्रीगुरू बालाजी तांबे यांनी केलेले हे निरूपण पाहा
Datta Jayanti, maharashtra, shriguru balaji tambe
datta jayanti
10:14 PM

7 Shlok Geeta in Marathi - Balaji Tambe

भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्‌भगवद्‌गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. शनिवारी (ता. 10 डिसेंबर) श्रीमद्‌भगवद्‌गीता जयंती आहे. त्यानिमित्त हे विशेष निरूपण -
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर कौरव-पांडवांची सैन्ये उभी आहेत. प्रत्यक्ष भगवंत उपदेश करत आहेत. हे युद्ध म्हणजे काहीच नाही. जीवनात अशी अनेक संकटे येतात, ज्यांच्यात जडलेली अस्त्रे-शस्त्रे आपल्याला दिसू शकत नाहीत. आपलेच नातेवाईक आपल्यासमोर युद्धासाठी उभे ठाकतात. दोन भावांमध्ये जमिनीची वाटणी झाल्यावर एका भावाकडे सहा इंच जमिनीचा पट्टा कमी आला, एवढ्यावरून तंटे होताना दिसतात. युद्ध काही काळ चालते, पण नंतर जीवन चालूच असते.
कुरूक्षेत्रावर दिसणारे युद्ध तात्कालिक आहे, हे एक रूपक आहे. प्रत्यक्षात प्रत्येकाला आपल्या स्वतःशीच युद्ध करायचे आहे. मनुष्याला युद्ध करायचे आहे व्यसनांशी, कुविचारांशी, त्याच्या आत असलेल्या राक्षसत्वाशी. शांती कशी मिळेल यासाठी भगवंतांनी श्रीमद्‌भगवद्‌गीतेत सविस्तर उपदेश केला आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता युद्धभूमीवर सांगितली गेली. युद्धभूमीवर आत्मा व मन सचेतन होते, सर्व इंद्रिये सावध होतात. येथे झालेली छोटीशी चूक मनुष्याला सरळ वरचा रस्ता दाखवते. युद्धभूमीवर एखाद्याच्या कानावर समजा शब्द आले, "अरे, तुझ्याकडे अस्त्र येत आहे, खाली बैस', तर हा संदेश अत्यंत सावधानतेने ऐकला जातो, ती व्यक्‍ती विनाविलंब खाली झुकते व बाण सूऽऽ सूऽऽ करत पलीकडे निघून जातो. तेव्हा युद्धभूमीवर सावधान असणे, साक्षीत्वता असणे खूपच आवश्‍यक असते. येथे तर प्रत्यक्ष भगवंत सांगत आहेत व भगवंत जे सांगत आहेत ते आपल्याला ऐकायचे आहे. "या स्वयं पद्मनाभस्य' म्हणजे प्रत्यक्ष भगवंत येथे उपदेश करत आहेत. सध्या आपल्याला अनेक वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे सल्ले मिळत असतात. "मित्र जोडण्यासाठी काय उपाय करावेत', वगैरे विषयांवरही आज पुस्तके उपलब्ध असतात. मित्र तर आपला जिवलग सखा असतो. तो आपलाच एक भाग असल्यासारखा असतो. मित्र-मित्र, पती-पत्नी यांच्यात एकमेकांना जिंकायची, एकमेकांवर कुरघोडी करायची भावना कदापि नसावी. त्यांच्यात एकमेकांना जिंकण्याची भावना आली तर या नात्यांनाच सुरुंग लागतो. मैत्री, प्रेम हे जन्मतःच असलेले आकर्षण असते, फक्‍त ते वाढवायचे असते.
आपल्याला जायचे आहे भगवंतांपर्यंत. आपल्याला शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, परमचैतन्याचा अनुभव घ्यायचा आहे. भगवंतांपर्यंत पोचण्याच्या मार्गात जे काही येईल त्याच्याशी आपल्याला लढायचे आहे. याचे मार्गदर्शन आपल्याला श्रीमद्‌भगवद्‌गीतेत मिळते. श्रीमद्‌भगवद्‌गीता वाचायला, तिचा अभ्यास करायला, ती आचरणात आणायला जात-पात, धर्म, देश, काळ असे कशाचाही बंधन नाही. श्रीमद्‌भगवद्‌गीता म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांचा मनुष्याशी असलेला संवाद आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीता हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ नाही, तो एक जीवनशास्त्रीय ग्रंथ आहे, एक मानवता गीत आहे. श्रीमद्‌भगवद्‌गीतेचा आमच्याशी काय संबंध असे म्हणून या मानवता गीताकडे कानाडोळा केला तर प्रत्यक्ष परमपुरुष परमात्म्याने केलेली चर्चा ऐकण्याच्या संधीला मुकावे लागेल. संसारात राहून, सामान्य जीवन जगत असताना, आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद्‌भगवद्‌गीतेत केलेले आहे. शांतीचा अनुभव घेण्यासाठी हिमालयाच्या गुहेतच जायला पाहिजे असे नाही, तर शांती आपल्यातच असते. आपण शांत झालो की जगातील कुठलाही कोलाहल आपल्याला त्रास देऊ शकत नाही. सारांश असा, की भगवंतांच्या चरणांपाशी जायचे आहे, शांतीचा अनुभव घ्यायचा आहे, आनंदाच्या डोहात आनंदाने पोहायचे आहे, आनंदाचा अनुभव घ्यायचा आहे. इतरांना मदत करत आयुष्यक्रमण करताना जीर्ण झालेले शरीर एक दिवशी सोडावे लागतेच. शरीर सोडताना भावना अशी असते की, मी हे शरीर सोडत आहे; पण दुसरे नवे शरीर घेऊन पुन्हा इतरांच्या मदतीला येईन.
सप्तश्‍लोकी गीता म्हणजे जणू गीतेच्या सातशे श्‍लोकांचा सारांशच आहे.
तसे पाहता, श्रीमद्‌भगवद्‌गीतेचे प्रत्येक अक्षरच जाणून घेण्यासारखे आहे. सप्तश्‍लोकी गीतेतील पहिला श्‍लोक आहे,
1) ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन्‌ माम्‌ अनुस्मरन्‌ ।
यः प्रयाति त्यजन्देहं स याति परमां गतिम्‌ ।।8-13।।

(जो कोणी ॐ या एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करत, माझे चिंतन करत, देह सोडून जातो तो पुरुष परम गतीला प्राप्त होतो.)
या श्‍लोकाआधी त्याच्या जोडीचा श्‍लोक आहे,
सर्वद्वाराणि संयम्य मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः प्राणम्‌ आस्थितो योगधारणाम्‌ ।।8-12।।

(सर्व इंद्रियांच्या द्वारांना आवरून, अर्थात इंद्रियांचा विषयांपासून निरोध करून, मनाला हृदयात स्थिर करून, आपल्या प्राणाला मस्तकात स्थापन करून व योगधारणेत स्थित होऊन)
हे दोन श्‍लोक वाचताना डोळ्यांत अश्रू येतात. माझे काय भाग्य असावे की प्रत्यक्ष भगवंतांनी कृपा करून मला या दोन श्‍लोकांचा दृष्टांत दिला होता. 1965-66 चा प्रसंग आहे. एकदा मी पाचगणी येथे बसलो होतो. गीतेचा अभ्यास चालू होता. इंद्रियांना ताब्यात आणण्याचा प्रयत्न होता. मनाला हृदयात (जे भगवंतांचे स्थान आहे.) आणून दारावर टिकटिक करण्याचा प्रयत्न सुरू होता, इच्छा होती, "हे भगवंता, एकदा तरी दर्शन द्या'. एकदम या दोन श्‍लोकांचा दृष्टांत झाला. भगवंतांनी सांगितले, ""मरण्याची आवश्‍यकता नाही. आपल्या स्थूल शरीराचा भाव सोडून द्या. हा भाव सुटला तर सूक्ष्म शरीर स्थूल शरीरापासून सुटे होईल व त्याला परमगती प्राप्त होईल.'' यासाठी मरून देह सोडण्याची गरज नसून, ॐकार उपासनेची गरज आहे.
भगवंतांना स्मरावे, त्यांच्या परमशक्‍तीचे, त्यांच्या स्पंदनांचे स्मरण करावे, ॐकाराची उपासना करत त्यांच्याशी एक होऊन जावे. असेही ॐकाराच्या उपासनेत स्थूल शरीरापासून सूक्ष्म शरीर सुटे होणे शक्‍य असते. "सोम' साधनेतही हाच फायदा मिळतो. यामुळे साधकाची सर्जनशक्‍ती वाढते, झोपेत फरक पडतो, परमशक्‍तीचे मार्गदर्शन मिळते. शांत झोप आल्यामुळे दिवसही शांततेत जातो.
जीवनभरात ॐ उच्चारलेला नसला, तर मृत्यू येत असताना शेवटच्या क्षणी ॐ कसा आठवेल? आठवला तरी एकदा ॐ आठवल्याने परमगती कशी काय मिळेल? तेव्हा "त्यजन्‌ देहं' याचा अर्थ "मृत्यूनंतर' असा नाही, हे नक्की. भगवंतांनी गीतेकडे, या दोन श्‍लोकांकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी दिली.
2) अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च ।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसंघाः ।।11-36।।

(हे हृषीकेशा, हे योग्यच आहे की, आपल्या नावाच्या व प्रभावाच्या कीर्तनाने जग अतिशय हर्षित होते व अनुरक्‍तही होते. तसेच भयभीत झालेले राक्षस लोक दशदिशांकडे पळून जातात आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करतात.)
हा श्‍लोक सप्तश्‍लोकी गीतेत का अंतर्भूत असावा?
प्रभाव दोन प्रकारचा असतो. सृष्टीचे निर्माणकर्ता, परमपुरुष, भगवंतांचा निर्देश आपण "तत्‌' या शब्दाने करतो. भगवान म्हणजे कोणी पुरुष वा स्त्री नाही, ते एक पूर्ण आहेत. भगवंत ही एक संकल्पना आहे. एक प्रोग्रॅम आहे. भगवंतांच्या ठायी स्फुल्लिंग आहे, स्फुरण आहे. म्हणजे त्यांच्यापासून स्पंदन निघते. गाडीत भरलेले पेट्रोल विशिष्ट ठिकाणी आले की त्यात स्पार्क पडतो. त्यातून शक्‍ती तयार होते व गाडी सुरू होते. पेसमेकर मनुष्याच्या हृदयाला एक स्पंदन, ठिणगी (स्पार्क) देतो. पेसमेकरने हृदयाला स्पार्क दिला की हृदयाचे आकुंचन प्रसरण होते, इतकेच नाही तर यामुळेच ओजही सर्व शरीरभर पोचायला मदत होते. भगवंतांच्यातून निर्माण झालेले स्पंदन विश्वात सर्वदूर पोचते, यामुळेच सर्व विश्वाचे व्यवहार सुरू राहू शकतात. तेव्हा हे स्पंदन किती शक्‍तिशाली असावे, याची आपल्याला कल्पना येऊ शकते. सर्व विश्व ज्यामुळे चालते ते स्पंदन किती मोठे असावे व असे स्पंदन ज्यांच्यातून निर्माण होते त्यांची शक्‍ती किती असावी? अशा महान शक्‍तीच्या अस्तित्वाच्या नुसत्या कल्पनेनेही आनंद मिळतो. बागेत बी पेरले, तर त्याला अंकुर येतो, त्याला दोन पाने फुटतात, रोप वाढायला लागते. हे सर्व पाहणाऱ्याला आनंद होतो, मन प्रसन्न होते. हे सर्व ज्या भगवंतांच्या संकल्पनेच्या जोरावर चालत असते, त्या भगवंतांचे सुंदर, रमणीय रूप पाहिले तर मन प्रसन्न होते. "स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या' म्हणजे आपल्या प्रभावामुळे सर्व जग हर्षित होते. परमेश्वर हे शांतिस्वरूप आहेत, तेच सत्यस्वरूपही आहेत. जेथे जेथे सत्य व शांती असेल, तेथे आनंदाचा अनुभव येतोच. असे झाले की मन प्रसन्न होते. अशा अफाट शक्‍तीच्या संपर्कात कोणी दुर्जन, नकारात्मक शक्‍ती असलेले आले तर ते भयभीत होतात, नष्ट होतात. ज्यांनी भगवंतांची आभा, प्रभाव जाणला आहे असे सिद्धगण भगवंतांना वारंवार नमस्कार करतात. आपली सिद्धी, आपली शक्‍ती, याच शक्‍तीतून आलेली आहे याची या सिद्धांना पुरेपूर कल्पना असते; आपली समृद्धी, आपली शांती, आपला आनंद ही त्यांचीच देणगी आहे या कल्पनेतून सिद्धगण त्यांना वारंवार नमस्कार करतात. भगवंतांशिवाय आपल्याला आनंद मिळणार नाही, शक्‍ती मिळणार नाही, त्यांच्याशिवाय जीवनच असू शकणार नाही.
भगवंतांनी रणांगणावर अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीमद्‌भगवद्‌गीता कथन केली. ती इतक्‍या काळानंतरही आपल्यालाही मार्गदर्शन करणारी आहे. त्यातील सात श्‍लोक आपल्या आयुष्यात पदोपदी मार्गदर्शक आहेत. त्यापैकी दोन श्‍लोकांचा आकळलेला अर्थ आपण याआधी पाहिला. येथे उर्वरित पाच श्‍लोक समजून घेऊ.
3) सर्वतः पाणिपादं तत्‌ सर्वतोऽक्षिशिरोमुखम्‌ ।
सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्य तिष्ठति ।।13-13।।

("तो' परमपुरुष परमात्मा सर्व बाजूंनी हात-पाय असलेला, सर्व बाजूंनी डोळे, डोकी व तोंडे असलेला, सर्वत्र कान असणारा आहे. कारण तो विश्वात सर्वांना व्यापून राहिलेला आहे.)
परमात्मा सर्वांचे कारणरूप असल्याने सर्व चराचराला व्यापून राहिला आहे. त्यांना हजारो कान आहेत, हजारो डोळे आहेत, त्यांची हजारो मुखे आहेत. तो सर्व जगाला व्यापून राहिलेला आहे. आपण कोणीही त्यांच्या या व्याप्तीतून बाहेर पडू शकत नाही. समुद्रात उतरले असता चारही बाजूंना समुद्र असतो, जगातील सर्व जण समुद्रात आले तरी समुद्र त्या सगळ्यांना सामावून घेतो. तसे वातावरणात असलेली भगवंतांची शक्‍ती एवढी प्रचंड आहे की आपण सर्व त्यात सामावले जातो, भगवंततत्त्व सगळ्यांना व्यापून राहिलेले आहे.
4) कविं पुराणम्‌ अनुशासितारम्‌ अणोरणियांसमनुस्मरेद्यः ।
सर्वस्य धातारमच्नित्यरूपम्‌ आदित्यवर्णं तमसः परस्तात्‌ ।।8-9।।

या श्‍लोकात आपल्याला काय करायचे आहे हे सांगितलेले आहे. येथे पुरुष शब्द हा लिंगवाचक नसून व्यक्‍ती असा आहे (संस्कृतमध्ये व्यक्‍ती असा अर्थ घेतला जातो).
परमात्मा हा सर्वज्ञ आहे, परमात्मा सर्व काही जाणतो; त्यांना आदि नाही, तसेच अंतही नाही, त्यामुळे त्यांचे ऐकावे लागतेच; तोच सगळ्या गोष्टींचा नियंता आहे, म्हणजे आपल्या सर्व दोऱ्या त्याच्याच हाती आहेत; तो छोट्याहून छोटा व मोठ्याहून मोठा आहे; तोच सर्वांचे धारण-पोषण करणारा आहे, त्यांचे स्पंदन आपल्यात प्राणरूपाने असतो, प्राण गेला तर सर्व संपून जाते; तो अचिंत्यस्वरूप आहे, म्हणजे आपण परमात्म्याच्या रूपाची कल्पना करू शकत नाही; तो सूर्याप्रमाणे नित्य चेतन आहे, म्हणजे या विश्वाच्या सुरवातीपासून सूर्य ज्याप्रमाणे बारा महिने, चोवीस तास प्रकाशत असतो, तसा परमात्मा सदैव प्राणस्पंदने देत असतो. तो अविद्येच्या पलीकडे आहे. अशा शुद्ध सच्चिदानंद परमघन परमात्म्याचे सदैव स्मरण करायला हवे. अशा परमात्म्याची लीला ध्यानात आली तर आपोआप हात जोडले जातात.
5) श्रीभगवानुवाच
ऊर्ध्वमूलमधःशाखम्‌ अश्वत्थं प्राहुरव्ययम्‌‌‌ ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्‌ ।।15-1।।

(आदिपुरुष परमेश्वराचे रूप हे मूळ असणाऱ्या ब्रह्मदेवरूपी मुख्य शाखा असणाऱ्या अशा अविनाशी वृक्षाला, ज्याची पाने वेद आहेत असे म्हणतात, त्या संसाररूपी वृक्षाला म्हणजेच त्या परमपुरुषाला जे तत्त्वतः जाणतात, तेच वेदांचे तात्पर्य जाणणारे आहेत असे समजतात.)
या श्‍लोकावरून आपल्याला बोध होतो, की आपल्याला वेदांचे तत्त्वतः अर्थ जाणायचे आहे. म्हणजे वेदांमधील श्‍लोकांचे वरवर दिसणारे अर्थ न घेता त्यांचे सांकेतिक अर्थ समजून घ्यायला हवे. हे समजून घेण्यासाठी आपल्या स्वतःच्या शरीरात डोकावून पाहणे आवश्‍यक होय. मेंदू हा ब्रह्म आहे व त्यापासून खाली जाणाऱ्या मेरुदंडातून असंख्य नाड्या जातात. अशा प्रकारे हा संसारवृक्ष आहे. झाडाची मुळे जमिनीतून अन्न-पाणी उचलतात, झाडाची मुळे जमिनीत असतात व झाड वर वाढते. या संसाररूपी वृक्षाला समजून घेण्यासाठी मेंदू हा संपूर्ण कार्यभाग चालवत असल्यामुळे त्या मेंदूपासून मेरुदंड खाली जात असल्यामुळे व त्याला येणारी सर्व इंद्रिये व अवयव आणि चालणारा व्यवहार ही त्या वृक्षाची वृद्धी समजल्यामुळे, जसे झाडाची मुळे जमिनीत असतात, तसे संसारवृक्षाची मुळे वर मेंदूत असतात, हे सांगण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, वेदांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी शरीरातच अनुभवता येतात. या गोष्टी परमेश्वराला उद्देशून असल्या, तरी तो परमेश्वर प्रत्येक व्यक्‍तीच्या शरीरात राहून व्यक्‍तीचे कार्य चालवत असतो.
6) सर्वस्य चाहं हृद संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्‍च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेव चाहम्‌ ।।15-15।।

पूर्वीच्या श्‍लोकात सामान्यतः दिसणाऱ्या अश्वत्थ वृक्षाचे वर्णन नसून शरीरात असलेल्या वृक्षाबद्दल भगवंत सांगत आहेत. या शरीरात असलेल्या वृक्षाची मुळे वर आहेत व वृक्ष खाली फोफावतो असे सांगितले आहे. या श्‍लोकाला पुष्टी देण्यासाठी भगवंत म्हणत आहेत, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने स्थित आहे. हृदयाच्या आत स्पंदन होते व आकुंचन- प्रसरणामुळे सर्व शरीरभर रक्‍त पोचवले जाते व शरीराकडून रक्‍त हृदयाकडे खेचले जाते. प्रत्येक पेशीत असलेला न्यूक्‍लिअस, जो प्राणशक्‍ती स्पंदित करतो, ते हृदय म्हणायला हरकत नाही. हृदय ही एक संकल्पना आहे असे समजून घेतले तर परमेश्वर हृदयात आहे व तेथून स्पंदने निघतात हे लक्षात येते. पुढे भगवंत म्हणत आहेत, की माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान व अपोहनही होतात. मेंदू वरून सर्व शरीराचे पोषण करतो, तसेच स्मृती, ज्ञान व वेगवेगळ्या विचारांनी संशय घालविणे या क्रियाही मेंदूच करतो. सर्व वेदांच्या द्वारे जाणून घेण्यायोग्य काही असेल तर तो परमेश्वर व त्याचे रूपच आहे. वेदांताचा कर्ता परमेश्वर आहे व वेदांना जाणणाराही परमेश्वरच आहे. म्हणजे सरतेशेवटी सर्व विचार मेंदूतूनच निघतात, मेंदूनेच त्यांचे वर्गीकरण व चिंतन करायचे असते आणि निर्णयही मेंदूनेच घ्यायचा असतो. विशिष्ट अवयवांना चालविण्याचे कामही मेंदूच करत असतो. अशा तऱ्हेने परमेश्वराचे व्यक्‍तिगत अनुभवाचे रूप भगवंतांनी या ठिकाणी समजावलेले आहे व उफराट्या शरीरवृक्षाची कल्पना समजावली आहे.
7) मन्मना भव मद्भक्‍तो मद्याजी मां नमस्कुरू ।
मामेवैष्यसि युक्‍त्वैवम्‌ आत्मानं मत्परायणः ।।9-34।।

(केवळ मज वासुदेव परमात्म्याच्या ठिकाणी अनन्यप्रेमाने नित्य मन ठेवणारा हो; श्रद्धेने, निष्कामभावाने माझे नाम, गुण व प्रभाव यांचे श्रवण, कीर्तन, मनन, पठण करत मज परमेश्वराला निरंतर भजणारा हो; मन, वाणी व शरीराद्वारा सर्वस्व अर्पण करून श्रद्धा, भक्‍ती व प्रेम यांनी विव्हल होऊन पूजन करणारा हो; मज वासुदेवाला विनयभावपूर्वक व भक्‍तीसहित साष्टांग प्रणाम कर; मला प्रणाम कर. याप्रमाणे मला शरण होऊन राहणारा तू आत्म्याला माझ्यामध्ये योजून मलाच येऊन मिळशील.)
परमात्मा म्हणजे सकारात्मकता, परमात्मा म्हणजे सत्य, परमात्मा म्हणजे दया. यातच कायम श्रद्धा असावी. इतर कशाचाही विचार करू नये. परमेश्वराला निरंतर भजणारे व्हावे. मानवतेला बट्टा लावणारे, मुलांना बिघडवणारे, इतरांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाणारे काही करू नये. केवळ भगवंतांवर श्रद्धा असावी. इतरांना मदत करणे हीच त्यांची खरी पूजा. समजा एखाद्या मुलाकडे फी भरायला पैसे नाहीत, तर त्याला चंदन लावून त्याची पूजा करण्याचा काय उपयोग? त्याला वह्या, पुस्तकांसाठी पैसे देणे, त्याच्या परीक्षेची फी भरणे हीच त्याची पूजा, हीच परमेश्वराची पूजा. परमेश्वराला लीनतापूर्वक प्रणाम करावा, अर्थात यासाठी खाली झुकावे लागेलच. असे सर्व करणारा स्वतः भगवंतस्वरूप होईल. भगवंत म्हणजे आनंद, परमानंद. हे सर्व करणारा परमानंदाला प्राप्त होईल, म्हणजेच परमेश्वरप्राप्ती होईल अशी ग्वाही स्वतः भगवंत देत आहेत.

Wednesday, December 21, 2016

3:21 PM

मसाला डोसा - Crispy dosa recipe

How to make crispy dosa recipe in marathi?

how to make dosa in marathi मसाला डोसा
how to make dosa in marathi

मसाला डोसा

How to make crispy dosa recipe in marathi?
how to make dosa in marathi
paper dosa recipe in marathi
how to make crispy dosa batter at home
sada dosa recipe in marathi
rava dosa recipe in marathi
crispy dosa recipe by sanjeev kapoor
dosa chutney recipe in marathi
sambar recipe marathi

Friday, December 2, 2016

8:29 PM

BRAND NEW FOODIE STORES




Hot. Hotter. Hottest. Mumbai's foodscape is rocking. I've been tracking it past three decades and it's never served up so much of choice, innovation and fun. And now that your very own Times Food Guides 2017 are going to press, I ate my way through a quick round-up... Cookies baked on site, candies made on-site, treasure trove of a deli and an ever-changing concept. Here's the best part: I'm all praises for the foodpreneurs, who are getting younger and younger (Sanjana Sanghi of Pop-Up Hut is 23-years-old). A quick round-up of the brand new...

Oh Dough, Kala Ghoda

Go. You must. It's a charming cookie, ice cream, coffee heaven. It's small (two marble topped tables and eight bentwood chairs) but it's powered by huge passion, dedication and a brothersister team (Cordon Bleu trained Ritika and Lausanne Hotel school graduate Pawan Chawla). The cookies are freshly baked (on-site) through the day. Everything is home-made -from marshmallows to ice creams.

Go savour those saucershaped, perfect textured cookies, be it the regular chocolate ones or the unusual ones (I love tang of the cranberry balsamic, the orchestra of flavours of S'mores and Chipzel). I love the smoked French vanilla ice cream, the dark chocolate and even the oozing umami Pistachio Black Truffle is recommended. Ooh la la! Vegan Dark Chocolate ice cream, eggless cookies, superb Affogato (smoked Vanilla ice cream with a shot of espresso), too.Where: Hind Rajasthan Chambers, 6 Allana Marg, Kala Ghoda, (022-2263 1313), 11.30 am to 11.30 pm; Monday closed.

POP-UP HUT, Kemps Corner

Pizza in a cone, gourmet kulfis, tea tasting... ever-changing excitement here. Walk through a narrow alleyway to get to this seriously small space. The brainchild of 23-year-old Boston and London educated Sanjana Sanghi, this curated marketplace promotes and provides a retail platform for budding chefs, food entrepreneurs and culinary experts. And happily offers newness to customers, too.

Till December 20, you can look forward to Chado tea (sip sit-shop of a 100 loose leaf teas). In January, it will be the unusual `Coney Island' -pizza in a cone, by 26 year-old Bharat Advani. Since they have opened, they've had home-made organic ice creams, Thai street desserts, natural, home grown and artisanal products by Anirban Poddar's Shophop (I'd popped in here and bought some, too), gourmet kulfis by Pistascia and more.Where: Kwality House, next to Crossword, below Kemps Corner Flyover (+91 98193 34698), Open 12 noon to 11 pm.

A SALUTI, Bandra

Khul ja sim sim... A gourmet's treasure trove. It specialises in obscure International ingredients from Guanciale, Truffle Salami, Wakame and Porcini to free range eggs and elderflower syrup. You'll find it all... selection of cheese -cow, sheep, goat and vegetarian; cold cuts -turkey, chicken, pork, duck, seafood. All meticulously sourced by Sapna Lawyer, who honed her skills in India's finest Fortune Gourmet Specialities Pvt Ltd, and worked in Spain and Dubai, too. Lagos born Milanda, patisseur extraordinaire (Bollywood superstar clientele too) bakes all the desserts (cupcakes, brownies, Apple and Cinnamon Streusel loaf cake to Éclairs) here. Also pestos, stocks, dips, salad dressings and more. And conducts gourmet cooking classes, too.

Where: Shop No 1, Shahina Apts, Pali Mala Road, Pali Market

PAPABUBBLE, Lower Parel

Go to this colourful candy production `theatre', where handmade candy (from Spain) is not only made, but you can also get it customised. Choose your colour and flavour and get your name written inside (yes, you read that right) each candy or the lollipops, too (remember to give them enough advance notice, though). Great for kids and adults.

Once again, it's two young owners, Samir Gadhok and Avani Raheja, who've brought in this variety of colours and over 40 flavours (watermelon to strawberry, paan masala and kala khatta, too). There is rock candy, marshmallows... but I loved the lollipops and with every lick and regressed to my happy childhood.

Where: Level 3, Palladium, 462 Senapati Bapat Marg (022-4023 5077), 11 am to 9 pm.
8:26 PM

The best vegetarian fare in Mumbai




Take your pick from a range of delicious vegetarian treats as our food critic chooses the best restaurants from across the city
Tuskers, Sofitel Mumbai BKC Here is the perfect place to get a taste of homestyle Maharaj's traditional vegetarian Rajasthani and Gujarati cuisine in a stylish setting. Named after the regal, vegetarian elephant, the French Sofitel's award-winning Tuskers serves shudh vegetarian fare in a plush, contemporary global ambience with sprawling bar and wine walls, Queen Anne high back leather chairs, patterned thick carpets, et al.

You have to try the rarely available and sublimely made Sanger ke Kofte with their perfect balance of texture and explosion of Ker Sanger's flavours. Even the Papad Bhuji with its crushed and spiced papad and Paneer-stuffed Gujhia pass muster. Kela Angur Tikki and Dal Baati Churma are worth trying too. All made in an independent, pure vegetarian kitchen. Kathiyawadi Undiyo, Rajwadi Dhokli, Panchkuta Subzi, Ajwaini Arbi, Bharwan Simla Mirch and Malpua are some of their must-try signature dishes.

Where: Sofitel Mumbai BKC, C-57, Bandra Kurla Complex, Bandra (E).

Timings: 12 pm to 3 pm (Lunch) and 7 pm to 11:30 pm (Dinner).

Call: +91 (22) 6117 5115.

Firki, Lower Parel Kathiawadi Cheese Toast, anyone? Vegetarian fun dining comes of age, with this pure vegetarian restaurant. Playfulness and colours weave their way through the décor and menu.Pinwheels, graffiti, wooden doll collections (including the firki on the walls) are a good signal of the meal that is to follow. A chaats-and-snacksoriented menu, make sure you look out for their daily specials. On the menu, you will find Cheese Chilli Sevpuri, Paneer Lifafa, Crispy Manchurian Bhel,Aloo Chaat, Masaledaar Paneer, and Dabeli Bruschetta. Sitting along many a Gujarati dish (also a dish or two from Uttar Pradesh, Maharashtra, South India and Sindh) are also plenty of innovative dishes.Amongst these, it's the two kinds of absurd-sounding pizzas which actually taste good -the Handavo Pizza (with its Gujarati handavo base) and the Pao Bhaji Pizza (with Pao Bhaji topping). Tiny gems of Baked Vada stuffed with Batata delight. As are the Fada ni Khichdi and the Bajra Chilla. End with Pepsi Ice Candy and the Oreo Nutella Cheesecake.Where: Firki, 1112, Block 27, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel.Call: 022-33126955.Cost for 2: `1,200.

Twenty Nine, Kemps Corner Hang on to your spoons and fasten your seatbelts as the engineer-turned-entrepreneur Nishek Jain's passion-fuelled restaurant takes you on a dizzying tour of Indian vegetarian food from 29 princely states of India.Vegetarians have never had so much choice. Or such attention to detail (onions for Pyaz Ki Kachori are brought in from Rajasthan and Tamil Sappad, Mahaprasada from the temple in Jaggannath Puri.) If it's Liti Chokha from Bihar, Kangsoi from Arunanchal Pradesh, the Haryanvi Soya Chaap or Nachni Satv from the northern Konkan region, it's all at offer under one roof.

Start with the four states in E the starter platter. Unusual and t yum Mizoram (pulse vegetable lal hara chaat with a tangy sweet dressing), okayish Dilli Tokri o Chaat and Potato Chops with Sanmeholi Chutney from Assam. End with delightful desserts be it the unique Mawa to Kesar Malai Ke Laddoo.

The menu changes every year on April 24 and November 24, and all recipes of the previous menu are available for patrons to take away free of cost. All this in a simple long white room with splashes of colour, with brightly coloured chairs.Where: Twenty Nine, Kemps Corner.Timings: 11:30 am to 3:30 pm and 7 pm to 11:30 pm.Call: 69992929, 65052999.Cost for two: `900 (approx) Reserve a table through http:www.Dineout.co.in

Swati Snacks, Tardeo and Nariman Point Swati Snacks is a Times Food Guide award-winning, no-frills, homestyle, vegetarian eatery where must-haves include the garlicky Panki served with green chutney and fried green chillis. Bhel, Pani Puri, Pav Bhaji, Panki, Satpadi Gatta, Fada Khichdi, sugarcane juice, coconut punch and homemade fresh ice creams (golden-fried jalebis and papdi are served for Sunday breakfast) are available too. Where: Swati Snacks, 48, Karai Estate, Javji Dadaji Marg, Opposite Bhatia Hospital,Tardeo.Also at Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point.Timings: 11:30 am to 10:30 pm.Cost for two: `800 (approx).Call: 65808405 06 07.

Panayaa, Lower Parel Panayaa lives up to it's Sanskrit name, which means to showcase something ostentatiously. Pure vegetarian Khaman Oxide, anyone? How about some sous-vide chaats and nitrogen-infused contemporary appetisers?
Making vegetarian fare stylish, the restaurant is all about the veg edge; it aims to reinvent desi gourmet with some crazy, whacky, out-of-the-box culinary experiments! From molecular gastronomy to the best of Indian regional dishes, Panayaa has it all. It redefines modern Indian cuisine in a 6,000 sq ft space with a palatial Indian décor. The menu features over 20 signature dishes that include cocktails appetisers, mains and desserts. The owners, Kiran and Kekin Dedhia (of Riso, Ithaka, and Firki fame), take molecular gastronomy to another level. Dig into the delicious Carrot Basil Kebab and Multani Paneer. From spherificated, deconstructed Dahi Vadas to Papdi Chaat Napolitano with Pomegranate Caviar.Arancini Khichdi with Lentil Tikki, Spear Cage Chaat, and Imarati Tori are recommended. Must ask for the Imarati Tori, Churan ke Nadru and for dessert Mohanthal Cheesecake and Chocolate Landscape.Where: Panayaa, Block No.25, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel.Call: 022-33126125.Cost for two: `1,700.

The American Joint Caution: Don't get misled by the name. This American Joint ain't got no steaks or burgers et al. It is, in fact, pure vegetarian and focuses on Jain food, as well as organic, preservative-free food. It is founded by four young entrepreneurs from Mumbai and USA, who believe in minimising the use of chemicals or additives and refraining from the use of microwaves. Go up the escalator of the fancy BKC office building into this seriously small glassed off, wooden floored space with green sofas. Proudly and unapologetically Indianised, it offers American plates inspired with characteristic Indian flavours. Place your order directly at the table on an electronic tablet and get ready for an Indo-western fusion.Jains have hit the jackpot here as even the fries are made of raw banana (instead of potato) and what a choice! Say Cheese & Chilli (raw banana) and Potato Fries, Bhajji Time and Tikktastic are all delicious. Chilli Cheese Burger (raw banana patty) and The American Mac n cheese are given a tikka twist, Falafalised Burger, a Greek salad, Nachos piled over with cheddar and more. Yum Sunday morning pancakes with maple syrup and Nutella.Generous portions and pocketfriendly prices.Where: The American Joint, 1st Floor, The Capital, Bandra Kurla Complex.Timings: 10:30 am to 12 pm.Call: 022 40233345 6.Price for two: `750.

Tuesday, November 22, 2016

2:32 PM

Masala Paratha Recipe In Marathi Language


कसा बनवायचा मसाला पराठा? | How to make Masala Paratha

खमंग आणि लज्जतदार, पोटभरीचा, सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ


Masala Paratha : मसाला पराठा

पराठा हा कुठल्याही ऋतूमध्ये, कुठल्याही वेळी चालणारा, सगळ्यांना आवडणारा पोटभरीचा पदार्थ आहे. अर्थात, पावसाळ्यात किंवा थंडीत गरमागरम पराठा आणि त्याबरोबर झणझणीत चटणी, लोणी, तूप किंवा दही, याची चव वेगळीच असते म्हणा. भाज्या, आलं, लसूण, मिरची किंवा असलंच काहीतरी मिश्रण कणकेच्या गोळ्यात घालून ते लाटून, भाजून त्याचा लज्जतदार पराठा करण्याचा शोध ज्यानं किंवा जिनं कुणी लावला असेल, तिला साष्टांग दंडवतच घालायला हवा. महाराष्ट्रात जितकी पुरणपोळी लोकप्रिय आहे, तेवढाच उत्तर भारतात पराठा प्रसिद्ध आहे. उत्तर भारतातला नाश्ता किंवा जेवण पराठ्याशिवाय पूर्णच होत नाही, असंही म्हणायला हरकत नाही. भारतीय लोकांना मसालेदार खाणं जास्त आवडतं. लवंग, वेलची, जायफळ, तमालपत्र, दालचिनी, मिरची, असले वेगवेगळे प्रकार एकत्र करून केलेला मसाला, वर कांदा, लसूण, आलं, यांची साथ असेल, तर मसाल्याला भन्नाट चव येते. पराठ्यांच्या मिश्रणातही हेच मसाले रंगत आणतात. कणकेत भरण्याचं हे सारण किंवा मिश्रण जेवढं जास्त मसालेदार आणि खमंग, तेवढी पराठ्याची चव वाढते. अगदी आलू पराठ्यापासून लच्छा पराठा, पनीर पराठा, मिक्स व्हेज पराठा, मुळ्याचा पराठा, असे अनेक प्रकार अस्तित्त्वात आहेत आणि ते सगळेच लोकप्रिय आहेत. दिल्लीसारख्या ठिकाणी तर लाल किल्ल्यासमोर खास पराठा गल्ली आहे. ही गल्ली आणि तिथले वेगवेगळ्या चवीचे पराठे ही दिल्लीची आणखी एक ओळख आहे. तिथल्या पराठ्यांची चव चाखल्याशिवाय आणि त्यांची तारीफ केल्याशिवाय दिल्लीची सहल पूर्ण होऊच शकत नाही. अर्थात, तेवढाच खमंग आणि खुसखुशीत पराठा घरीसुद्धा बनवता येतो. बाहेरच्या पराठ्यांमध्ये मैद्याचा वापर जास्त असतो. तो टाळून घरी कणकेपासूनही उत्तम पराठा बनू शकतो. आज आपण बघूया, मसाला पराठ्याची रेसिपी.
साहित्य

  • एक चमचा धनेपूड
  • एक चमचा जिरे पूड
  • चार चमचे गरम मसाला
  • चिरलेली कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • पाव चमचा पिठीसाखर
  • दोन-तीन चमचे तीळ
  • बटर
  • दोन वाट्या गव्हाच्या पीठाची भिजवलेली कणीक
पाककृती

  • तीळ सोडून सर्व मसाले एकत्र कालवावेत.
  • कणकेचा एक गोळा घेऊन फुलक्याएवढी पोळी लाटावी.
  • पोळीला बटर लावावे.
  • तयार मसाल्यापैकी 1 चमचा मसाला पोळीवर पसरून त्याचा घट्ट रोल करावा.
  • रोल चकलीप्रमाणे घट्ट वळवावा. तिळ टाकून दाबावा.
  • पीठ लावून जाडसर पराठा लाटावा.
  • तेल सोडून खरपूस भाजून घ्यावा. चटणी, दही, तूप किंवा लोणच्याबरोबरही गरम पराठा छान लागतो.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
एकूण वेळ : २५ मिनिटे
पदार्थाचा प्रकार : जेवणातील पदार्थ
किती व्यक्तींसाठी : २ व्यक्तींसाठी

masala paratha recipe in marathi

masala paratha recipe in hindi

masala paratha recipe video

masala paratha by sanjeev kapoor

simple masala paratha

paratha 301 recipes

paratha recipe hindi

paratha recipe in gujarati language

paratha recipes by sanjeev kapoor
2:27 PM

Patti samosa recipe in marathi


कसा बनवायचा पट्टी समोसा? | How to make Patti Samosa

चुरचुरीत आणि चटपटीत, गप्पांच्या मैफलीत रंग भरणारा पदार्थ


Patti Samosa : पट्टी सामोसा

काही पदार्थ खाण्याला एक ठराविक वेळ, काळ असावा लागतो. म्हणजे, ते तसे कुठल्याही वेळी खाता येतात, पण ते विशिष्ट वेळी खाल्ले, तर त्यांची लज्जत वाढते. सकाळी चहाबरोबर पेपर वाचत, गप्पा मारत चकली कुडकुडवण्यात किंवा बिस्किटाचे तुकडे मोडण्यात वेगळीच मजा असते. त्यानं चहाची रंगत वाढते. दुपारच्या जेवणात पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर भाजी, आमटी असेल, तरी वेगळी चटणी, कोशिंबीर असली, तर जेवणाला खास चव येते. कुठल्या पदार्थाबरोबर कुठली चटणी खायची, हे गणितही ठरलेलं असतं. तशी समोसा ही गोष्ट संध्याकाळी, मस्त गार वारा सुटलेला असताना, एखाद्या आवडत्या कट्ट्यावर गप्पा हाणत बसल्यानंतर खायची गोष्ट आहे. सामोसा खाणं हीच एक मैफल असते. आत वेगळं सारण, बाहेरून वेगळं आवरण, हे दोन्ही तळल्यानंतर त्याला येणारी एक आगळी चव, चटपटीत आणि झणझणीतपणा, याची कशाशी तुलनाच होऊ शकत नाही. संध्याकाळच्या अशा गप्पांच्या मैफलीबरोबरच समोसाची चव द्विगुणित होते, ती थिएटरच्या मध्यांतरात. अर्ध्या सिनेमाचा आनंद घेऊन झाल्यानंतर समोसा चघळत आणि चहा किंवा कॉफीचे घुटके घेत त्यावर चर्चा करण्याचा आनंद वेगळा असतो. सामोशाचाच धाकटा भाऊ म्हणजे पट्टी सामोसा. इराणी हॉटेलमधला हा लोकप्रिय प्रकार अतिशय चविष्ट आणि स्वतःची वेगळी ओळख राखणारा. नेहमीच्या सामोशापेक्षा जास्त चुरचुरीत आणि छोटा असल्यामुळे काही लोकांना हा जास्त आवडीचा असतो. विशेषतः जागतिक आरोग्य वगैरे गंभीर समस्यांवर चर्चा करायची असेल, तर चहा आणि पट्टी सामोसा, यांना पर्याय नाही! तुम्हीसुद्धा घरी हा सामोसा (आणि चर्चा!) करून बघा.
साहित्य

  • आवरणासाठी
  • २ वाट्या मैदा
  • १ वाटी बेसन
  • ५ चमचे तेल (मोहनासाठी)
  •  
  •  
  • सारणासाठी
  • १ वाटी मटार
  • २ उकडलेले बटाटे
  • अर्धी वाटी उभा चिरलेला कोबी
  • ३-४ हिरव्या मिरच्या
  • १ चमचा गरम मसाला
  • १ चमचा लिंबू रस
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल
  • फोडणीचे साहित्य: ३-४ चमचे तेल, मोहोरी, जिरे, हिंग, हळद
पाककृती

  • सर्वप्रथम मैदा व बेसन एकत्र करावे. ५ चमचे तेलाचे कडकडीत मोहन घालावे. चवीपुरते मीठ घालावे. पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे.
  • बटाटे सोलून त्याच्या छोट्या छोट्या चौकोनी फोडी कराव्यात किंवा स्मॅश करावेत.
  • फ्राईंग पॅनमध्ये ३-४ चमचे तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या घालून फोडणी करावी
  • फोडणीत कोबी घालून परतावा आणि एक वाफ आणावी.
  • नंतर मटार घालून मध्यम आचेवर वाफ काढावी. अधूनमधून ढवळावे.
  • मटार शिजले कि बटाट्याच्या फोडी घालून वाफ आणावी.
  • नंतर त्यात गरम मसाला, मीठ, लिंबू रस घालून ढवळावे. गॅस बंद करावा. मिश्रण गार होऊ द्यावे.
  • भिजवलेल्या पिठाच्या फुलक्याच्या आकाराच्या पातळसर पोळ्या लाटाव्यात. प्रत्येक पोळी दोन्ही बाजूने फक्त ४ सेकंद भाजावी.
  • १/२ वाटी मैदा घेऊन त्याची घट्टसर पेस्ट बनवावी. भाजलेल्या प्रत्येक पोळीचे सुरीने दोन अर्धगोलाकार भाग करावेत.
  • अर्धगोलाच्या दोन्ही बाजूंवर पेस्ट लावून एकमेकावर जोडून कोन बनावावा.
  • कोनात २ चमचे भाजी भरून राहिलेल्या बाजूला पेस्ट लावून ती बाजू दुमडून चिकटवावी. त्रिकोणी आकार द्यावा. सामोसे मध्यम आचेवर तळून घ्यावेत.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : २० मिनिटे
एकूण वेळ : ४० मिनिटे
पदार्थाचा प्रकार : नाश्ता
किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी



patti samosa recipe in marathi

how to prepare samosa patti

patti samosa recipe by sanjeev kapoor

poha patti samosa recipe

samosa recipe in marathi language

patti samosa in mumbai

readymade samosa patti

patti samosa dough

samosa recipe in marathi video
2:24 PM

Alu vadi maharashtrian recipe in marathi










कशी करायची अळूवडी? | How to make Alu Vadi

सहज आणि झटपट बनणारा, चमचमीत आणि खमंग पदार्थ

Alu Vadi : अळू वडी

घराच्या मागच्या अंगणात अळवाचे दोन कांदे सुखानं एकत्र नांदत होते. एकाच मातीतलं वाटून खायचं, एकमेकांच्या वॉटरबॅगमधलं पाणी प्यायचं, किड्यामुंग्यांपासून एकमेकांना वाचवायचं, सकाळी डोकावून बाहेर बघायचं आणि अंधार पडला की मातीचं पांघरूण घेऊन छान झोपून जायचं, हा त्यांचा दिनक्रम. एके दिवशी दोघांनाही कोंब फुटले. ते फुटण्यात काही तासांचं अंतर होतं, म्हणून एक झालं धाकटं अळू आणि दुसरं झालं थोरलं. दोन्ही कोंब वाढत गेले आणि त्यांना आणखी कोंब फुटले. त्यातून अळवाच्या जाड देट्या तयार झाल्या, त्यांना पानं फुटली आणि ती पसरली, वाढली. मग त्या देट्यांना शिंगं फुटली. कोण जास्त मोठं, कुणाची पानं जास्त रुंद, सुंदर, याच्यावरून स्पर्धा सुरू झाली. थंडीचे दिवस होते. एके दिवशी सकाळी पानांवर दव पडलं. धाकट्या अळवाला त्याचा गर्व झाला. त्याला वाटलं, आपल्या अंगावर मोतीच उगवलेत. मोठं अळू मात्र शांत होतं. त्याच्याही अंगावर असे मोती जमा झाले होतेच, पण त्याला गर्व झाला नव्हता. धाकट्यानं लगेच थोरल्याला चिडवायला सुरुवात केली. आपल्याच अंगावरचा मोती जास्त मौल्यवान आणि सुंदर, असं त्याला वाटायला लागलं होतं. त्या निमित्तानं मनात दडून बसलेल्या काही दिवसांच्या कटू भावनाही ओठांवर आल्या. तरीही थोरल्यानं प्रतिक्रिया दिली नाही. त्याचं आपलं नेहमीचं काम सुरू होतं. उन्हं वर आली, पानं हलायला लागली, तशी मोतीसुद्धा इकडे तिकडे व्हायला लागले. सूर्यप्रकाशाच्या दिशेनं पानांनी माना जरा वर केल्या आणि काही मोतीही टपाटप गळायला लागले. अजूनही धाकट्याचा गर्व काही कमी होत नव्हता. अचानक कुणीतरी दोन्ही अळवांच्या पानांना गदगदा हलवतंय, अशी जाणीव झाली आणि काही लक्षात यायच्या आत मालकानं पानं आणि देटी दोन्ही कापून टोपलीत भरली. अळूवड्या तयार होऊन डिशमध्ये उतरल्या आणि थोड्याच काळात पाहुण्यांच्या जिभेवरही पडल्या. एका पाहुण्यानं एकदम तोंडातला घास बाहेर काढला, गटागटा पाणी प्यायलं. “कशीतरीच लागतेय वडी!“ त्यानं एकदम तोंड वाकडं केलं. “हो का? अरे देवा! खाजरं दिसतंय अळू!“ मालकीणबाई म्हणाल्या आणि त्यांनी `ह्या खाऊन बघा,` म्हणत दुसऱ्या वाडग्यातल्या वड्या त्यांच्यासमोर ठेवल्या. पाहुण्यानं त्या चवीनं खाल्ल्या. `ह्या धाकट्याची खाज अजून जात नाही!` थोरल्यानं तोंडात पडल्यापडल्या प्रतिक्रिया व्यक्त केली.

साहित्य

  • अळूवड्यांची आठ पाने (भाजीचं आणि वड्यांचं अळू वेगळं असतं, ते पारखून, विचारून घ्यावं.)
  • १ वाटी हरभरा डाळीचे पीठ
  • १ चमचा कॉर्नफ्लोअर
  • चवीनुसार मीठ
  • जिरं २ छोटे चमचे
  • पांढरे तीळ १ छोटा चमचा
  • चिंचेचा कोळ १/४ वाटी
  • २ चमचे किसलेला गूळ
  • तळण्यासाठी तेल
  • ओलं खोबरं १/२ वाटी
  • 2 चमचे लाल तिखट
  • चिमूटभर हळद
  • चिमूटभर हिंग
  • ओलं खोबरं
  • कोथिंबीर
पाककृती

  • डाळीच्या पिठात कॉर्नफ्लोअर, लाल तिखट, मीठ, तीळ, जिरे, हळद, हिंग, चिंचेचा कोळ, गूळ घालून एकजीव करून घ्यावे.
  • थोडे पाणी घालून घट्टसर भिजवून घ्यावे. खार पातळ करू नये.
  • अळूची पाने स्वच्छ धुवून पुसून घ्यावी. देठ कापून टाकणे. पानाच्या मागील बाजूवर मिश्रणाचा पातळ थर हाताने पसरावा.
  • त्यावर दुसरे पान उलटे ठेवावे आणि मिश्रण पसरावे.
  • अशा प्रकारे एकावर एक 4 पानांवर मिश्रण पसरून दोन्ही बाजूने आत पान दुमडून छान रोल करावा.
  • रोल करताना मध्ये मध्ये मिश्रण लावावे.
  • कूकरच्या भांड्याला तेल लावून रोल ठेऊन कुकरमध्ये शिट्टी न लावता १०-१५ मिनिटे वाफेवर रोल शिजवून घ्यावा.
  • शिट्टी लावल्यास 3 ते 4 शिट्ट्या कराव्यात.
  • कूकरमध्ये न लावता ढोकळ्याप्रमाणे बाहेरही शिजवता येतो.
  • थंड झाल्यावर उभे काप करून गरम तेलात कुरकुरीत तळून घ्यावे किंवा शॅलो फ्राय करून घ्यावे.
  • ओलं खोबरं आणि कोथिंबीर पसरवावी.
पाककृतीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे
पूर्वतयारीसाठी लागणारा वेळ : १० मिनिटे
एकूण वेळ : २५ मिनिटे
पदार्थाचा प्रकार : स्नॅक्स
किती व्यक्तींसाठी : ४ व्यक्तींसाठी

alu vadi maharashtrian recipe in marathi

alu vadi recipe in marathi video

alu vadi recipe by sanjeev kapoor

alu vadi recipe by nisha madhulika

aloo vadi recipe in hindi

alu vadi recipe by archana

alu wadi recipe in marathi

aluchi bhaji recipe in marathi

alu vadi recipe punjabi
marathi
alu vadi recipe by sanjeev kapoor
alu vadi recipe by nisha madhulika
aloo vadi recipe in hindi
alu vadi recipe by archana
aluchi bhaji recipe in marathi
alu vadi recipe punjabi
alu wadi leaves
alu vadi recipe tarla dalal

Wednesday, November 16, 2016

1:15 PM

paschim maharashtra recipe