Puranpoli - Marathi recipe
साहित्य :-
१) एक कप चणाडाळ.
२) एक कप किसलेला गूळ.
३) एक कप मैदा.
४) अर्धा कप कणीक.
५) सात ते आठ टेबलस्पून तेल.
६) एक टीस्पून वेलची पूड.
कृती :-
चणाडाळ (बेसन ज्यापासून तयार करतात ती डाळ) कूकरमध्ये चणाडाळीच्या अडीचपट पाणी घालून शिजवून घ्यावी. डाळ शिजली की त्यातील पाणी पातेल्यात निथळू द्यावे. हेच पाणी वापरून कटाची आमटी करता येते. डाळीतील पाणी निघून गेल्यावर ही डाळ पातेल्यात घ्यावी. व पातेले गॅसवर ठेवावे. त्यात किसलेला गूळ घालावा.
मध्यम आचेवर हे मिश्रण आटवावे. मिश्रण आटवताना ढवळत राहावे. जर ढवळायचे थांबवले, तर मिश्रण पातेल्याला लागून करपू शकते. या पुरणात आवडत असल्यास १ चमचा वेलची पूड घालावी.
मिश्रण घट्टसर झाले की पातेले गॅसवरून उतरवावे. मिश्रण गार होऊ द्यावे. पुरणयंत्रातून ते काढून घ्यावे. जर पुरणयंत्र नसेल तर मिक्सरमध्ये बारीक करावे.
मैदा आणि कणीक एकत्र करून त्यात ५-६ चमचे तेल घालावे आणि सैलसर मळून घ्यावे. पुरणपोळीची कणीक सैलच भिजवावी. कारण अशी कणीक लाटायला सोपी पडते व पोळी व्यवस्थित पातळ होते. कणीक घट्ट असेल, तर पोळी फाटू शकते. भिजवलेले पीठ १-२ तास मुरू द्यावे. पुरणाचे गोळे बनवून घ्यावेत. मैद्याचा अर्धा ते एक इंचाचा गोळा घ्यावा व त्याची पातळसर पारी बनवून घ्यावी. त्यात पुरणाचा गोळा भरावा. सर्व बाजूंनी बंद करून घ्यावा. पोळपाटावर थोडा मैदा भुरभुरावा आणि हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी. तव्यावर खरपूस भाजून घ्यावी.
साजूक तूप घालून गरम गरम खायला द्यावी. आठ एक दिवस सहज टिकतात. गार झालेल्या पोळ्या दुधाबरोबर छान लागतात किंवा आवडत असेल, तर कटाच्या आमटीबरोबर देखील पुरणपोळी छान लागते.